सरकारी बँकांनी एका वर्षात बंद केले 5500 ATM आणि 600 शाखा, जाणून घ्या यामागील कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी बँका आपला खर्च कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहेत. अशातच त्यांनी यासाठी एक नवीन पाऊल उचलले असून सार्वजनिक क्षेत्रातील बँका मोठ्या शहरांमधील आपले एटीएम आणि शाखा बंद करीत आहे. यामागील कारण असे सांगितले जात आहे की शहरात राहणाऱ्या लोकांचा कल इंटरनेट बँकिंगकडे बऱ्याच प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे गरज कमी झाल्याने शाखा आणि एटीएम सारख्या पायाभूत सुविधा कमी केल्या जाऊ शकतात, असा बँकांचा दावा आहे.

बँकांनी खर्च कमी करण्यासाठी आखली योजना :
गेल्या एका वर्षात, देशातील १० सरकारी बँकांनी (ज्यांच्या देशात सर्वाधिक शाखा देखील आहेत) एकूण ५,५०० एटीएम आणि ६०० शाखा बंद केल्या आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार बँकांच्या तिमाही कामगिरीचे विश्लेषण करून ही माहिती मिळविली आहे. ताळेबंदातील (बॅलन्स शीट) खर्च कमी करण्यासाठी सरकारी बँका NPA कमी करण्याचा विचार देखील करीत आहेत.

SBI बर्‍याच शाखा व एटीएम बंद केल्या :
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने जून २०१८ ते २०१९ दरम्यान ४२० शाखा आणि ७६८ एटीएम बंद केले आहेत. त्याचबरोबर विजया आणि देना बँकेचे विलिनीकरण झाल्यानंतर बँक ऑफ बडोदाने एकूण ४० शाखा आणि २७४ एटीएम बंद केले आहेत. पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक आणि अलाहाबाद बँक यांचा सरकारी बँकांचा या यादीत समावेश आहे.

खाजगी बँका मात्र वाढवत आहे शाखांचे जाळे :
एकीकडे सरकारी बँका खर्च कमी करण्यासाठी नेटवर्क कमी करत असताना, दुसरीकडे खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेने आपले बँकिंग नेटवर्क वाढविले आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार या बँकांनी विशेषत: शहरी भागात आपल्या एटीएम ची संख्या वाढविली आहे.

ग्रामीण भागात कोणतीही कपात नाही :
या अहवालात असेही समोर आले आहे की बँकांच्या शाखा व एटीएमच्या कपातीचा ग्रामीण बँकांवर परिणाम झाला नाही. ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात या कपात करण्यात आल्या नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like