प्रेग्नंट महिलेवर 5 मित्रांकडून 11 वेळा सामुहिक ‘बलात्कार’, तिघांचा पोलिसांचा ‘इंगा’

बांसवाडा (राजस्थान) : वृत्तसंस्था – एका गभर्वती महिलेवर पाच मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल ११ वेळा सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थान मधील बांसवाडा मध्ये घडली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून या आरोपींवर पाच हजार रुपयांचे बक्षीस होते. या घटनेनंतर महिलेचा गर्भपात झाला असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सुनील चरपोटा याचे साथीदार विकास, गब्बू आणि कालजी यांना अटक केली आहे. सुनील चरपोटा याच्यावर पाच हजार रुपयांचे बक्षीस आहे. आरोपींनी महिलेवर सामुहीक बलात्कार करून तिला लुटल्याची कबुली दिली आहे. हा प्रकार १३ जुलै रोजी रात्री घडला. पीडित महिला आपल्या प्रियकरासोबत गावाकडे येत असताना सुनील, विकास आणि जितेंद्र यांनी दारूच्या नशेत शस्त्राचा धाक दाखवून महिलेवर सामुहीक बलात्कार केला.

गावाकडे येत असताना आरोपींनी दोघांवर हल्ला केला. यामध्ये पीडित महिलेचा प्रियकर बेशुद्ध झाल्यानंतर महिलेला उदपुरच्या बस स्थानकापासून काही अंतरावर घेऊ गेले. या ठिकाणी आरोपींनी तिच्या वर सामुहीक बलात्कार केला. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या आणखी दोन मित्र नरेश आणि विजय यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यांनतर आरोपींनी पहाटे चार पर्यंत पीडित महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला.

प्रियकराची आत्महत्या

आपल्या प्रेसयसीला या घटनेत वाचवू शकलो नसल्याची खंत प्रियकराला होती. तसेच समाजातील आपला मान सन्मान धुळीस मिळेल त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. त्यातूनच त्याने आत्महत्या केली. १४ जुलै रोजी रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रियकराच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून पोलिसांनी प्रियसीचा शोध घेतला. यानंतर पाच आरोपी महिलेवर कित्येक दिवस सामुहीक बलात्कार करत असल्याचे समोर आले.

आरोग्यविषयक वृत्त –