Baramati Crime | पोलिसांच्या भीतीने पळ काढत थेट नदीत उडी, एकाचा बुडून मृत्यू; संतप्त जमावाच्या हल्ल्यात 3 पोलिस जखमी, बारामती तालुक्यात प्रचंड खळबळ

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati Crime | अवैध दारु व्यवसायावर कारवाईसाठी आलेल्या पोलिस पथकाच्या (Pune Rural Police) भीतीने पळ काढताना निरा नदीवरील बंधाऱ्यात बुडुन एकाचा मृत्यु (Died) झाला आहे. ही घटना बारामती तालुक्यातील सोनगाव (Songaon) येथे घडली. या घटनेनंतर येथील संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात 3 पोलिस कर्मचारी जखमी (3 police personnel injured) झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती (Baramati Crime) कळते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे.

 

याबाबत माहिती अशी, मंगलेश अशोक भोसले (Manglesh Ashok Bhosale) (वय 45, रा. सोनगाव) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. येथील अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. यावेळी पोलिसांची चाहूल लागल्याने मंगलेश भोसलेने भीतीपोटी पळ काढला. तसेच त्याने लगतच्या निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारत पलिकडील तीरावर पोहून जात निसटण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोहताना दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू (Died) झाला. असं सुत्राकडून सांगितलं आहे. (Baramati Crime)

 

दरम्यान, येथील संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात 3 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
त्याचबरोबर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने जादा पोलिसांची (police) तुकडी मागवत घटनास्थळी ती पाठवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

 

Web Title :- Baramati Crime | one drowned while fleeing fear police baramati 3 police personnel are injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मारहाणीचा जाब विचारणाऱ्या तरुणांवर प्राणघातक हल्ला, विमानतळ पोलिसांकडून 4 जणांना अटक

नोव्हेंबरमध्येच नोकरदार आणि Pensioner ने उरकून घ्यावीत ‘ही’ सर्वात महत्वाची कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Sanjay Raut | संजय राऊतांचं मोठं भाकित, म्हणाले – ‘2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 48 पैकी 45 जागा जिंकेल’