Baramati-Daund Primary Health Centre | बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी 12 कोटी 63 लाख रुपये मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन –  Baramati-Daund Primary Health Centre | राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Baramati NCP MP Supriya Sule) यांनी ही माहिती दिली. (Baramati-Daund Primary Health Centre)

या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ७६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

याबरोबरच दौंड तालुक्यातील रावणगाव येथे

प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकाम करण्यात येणार आहे.
त्यासाठी ६ कोटी २२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार
(NCP Leader Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून यासाठी जिल्हा परिषदेचे (Pune ZP)
तत्कालीन उपाध्यक्ष रणजित शिवतरे (Ranjit Shivatare) यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता.

Web Title :  Baramati-Daund Primary Health Centre 12 crore 63 lakhs sanctioned for primary health centers and staff accommodation in Baramati and Daund talukas – NCP MP Supriya Sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Bypoll Election | ‘…तर मी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार’, मनसे नेते वसंत मोरेंचं मोठं विधान

Palkhi Sohala 2023 – Pune Traffic Updates | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी 17 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात