Baramati Lok Sabha | ‘बारामतीप्रमाणेच संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना संधी द्या’ – महादेव जानकर (VIDEO)

इंदापूर : Baramati Lok Sabha | बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या विकासात भर घालण्यासाठी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा (Baramati Lok Sabha) डबल विकास करण्यासाठी महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना संसदेत पाठवा असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केले.

काल परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. त्यानंतर महादेव जानकर हे थेट बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात उतरले आहेत. आज त्यांनी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर या ठिकाणी जाऊन शंभू महादेव अभिषेक घातला.. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात जुन्या सवंगड्यांसह पोहण्याचा व रानमेवा खाण्याचा आनंद घेतला. त्यानंतर ते महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात उतरले आहेत.

बारामतीसारखाच संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल
तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना खंबीरपणे साथ द्या असे आवाहन महादेव जानकर यांनी यावेळी केले.
देशातील महत्वपूर्ण लढत म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. त्यामुळे मतदान करताना आपल्या मतदारसंघाची
प्रगती करण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असेही जानकर यांनी नमूद केले.

यावेळी ॲड. सचिन राऊत. ॲड. श्रीकांत करे, विजय पाटील, महेश जठार,
अभिजीत शहाणे यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

उमेदवारी मिळण्याची शक्यता संपली, वायकरांपाठोपाठ काँग्रेसचे निरुपम देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता