Sanjay Raut On Ajit Pawar | संजय राऊतांची अजित पवार, नारायण राणेंवर खरपूर टीका, म्हणाले ”मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजाने त्यांना…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Raut On Ajit Pawar | बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) विक्रमी मताधिक्क्याने सुप्रिया सुळे (Supriya Sule) विजयी होतील. मला सुनेत्रा पवारांची (Sunetra Ajit Pawar) दया येते. त्यांच्याविषयी वाईट वाटत आहे. त्यांच्या पतीराजाने त्यांना म्हणजेच एका गृहिणीला बळीचा बकरा बनवला. भाजपा (BJP) संपूर्ण देशात दारुण पराभवाच्या छायेत आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक विद्यमान खासदार हे यावेळेला लोकसभेत दिसणार नाहीत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी करत अजित पवार आणि नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर खरपूस टीका केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

तर नारायण राणेंवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, नारायण राणे यांच्याबाबतीत पराभवाचा चौकार मारला जाईल.
तीन वेळा आम्ही त्यांचा पराभव केला आहे. कोकणातही केला आणि मुंबईतही केला. आता ते मोठ्या स्पर्धेत उतरलेत.
पण विनायक राऊत (Vinayak Raut) पुन्हा एकदा लोकसभेत जातील. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येऊ द्या किंवा अमित शहा (Amit Shah) येऊ द्या महाराष्ट्रातील जनता हे आता सहन करणार नाही, असे राऊत म्हणाले.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले,
नरेंद्र मोदींनी पेडर रोडला घर भाड्यावर घेतले आहे. अमित शाहांनी बोरीवलीत भाड्याने घर घेतले आहे.
त्यांना इथेच राहायचे आहे. मणिपूर आणि काश्मीर खोऱ्यात जायला त्यांच्याकडे वेळ नाही.
त्यामुळे निवडणूक होईपर्यंत ते इथेच राहणार आहेत. पण तुम्ही कितीही खुंट्या ठोका, महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव करता येणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baramati Lok Sabha | बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस, अजित पवार गटाने पैसे वाटल्याचा आरोप, तक्रार दाखल, रोहित पवारांनी शेयर केले व्हिडिओ, पीडीसी बँक रात्री बारा वाजताही सुरू (Video)

Murlidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार – मुरलीधर मोहोळ

Rohit Pawar On Ajit Pawar | काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन तयार रहावं…, रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल