Video : दलित मुलाशी लग्न केल्यानं वडिल भाजप आमदाराकडूनच जीवाला धोका, मुलीचा व्हिडीओ व्हायरल

बरेली : वृत्तसंस्था – दलित मुलाशी लग्न केल्यानं जीवाला धोका असल्याचा भाजपा आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे. मुलीचे वडील बितरी चैनपुरी जिल्ह्यातील भाजपा आमदार आहेत. राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल असे या आमदाराचे नाव आहे. त्यांच्या मुलीनं दलित मुलाशी लग्न केल्याने पप्पू भरतौल यांनी मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली असून या धमकीचा व्हिडीओ बुधवारी रात्री व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी मुलीने वडीलांविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली असून यामध्ये तिने भाऊ विक्की भरतौल आणि भावाचा मित्र राजीव राणा यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुलीने पोलीस आयुक्तांकडे सुरक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.

साक्षी असे मुलीचे नाव असून तिने अजितेश कुमार या दलित मुलाशी लग्न केले आहे. लग्नानंतर वडील पप्पू भैरतौल यांनी अजितेश कुमारला जीवे मारण्याची धमकी दिली. साक्षीने एक व्हिडीओ तयार केला असून आपल्या पतीच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. या व्हिडोमध्ये पती अजितेश कुमार देखील असून दोघांनी हिंदू पद्धतीने रितसर लग्न केले आहे. मात्र, आता हे लग्न दोघांच्याही जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये साक्षीने जातीबाहेरच्या मुलासोबत लग्न केल्याने जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. आमदार असलेल्या वडीलांचे लोकं आमच्या मागावर असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांचे मित्र राजीव राणा आणि त्यांची माणसं हॉटेलमध्ये दाखल झाली असल्याचा दावा तिने व्हिडोओमध्ये केला आहे. दरम्यान, या लग्नामुळे आपण खुश असून पति किंवा त्याच्या कुटुंबियांना काही झाल्यास सर्वांना तरुंगात पाठवेन असा इशारा तिने आपल्या वडिलांना दिला आहे.

साक्षी आणि अजितेश कुमार या दोघांनी ४ जुलै रोजी प्रयागराज येथे हिंदू पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर दोघंही घरातून बेपत्ता झाले. अजितेश कुमार हा फरिदपूर येथील आमदाराचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर साक्षीने आपल्या आमदार वडिलांकडून पतीच्या जीवाला धोका असल्याचे सांगत व्हिडीओ व्हायरल केला आहे.

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like