फॉर्म्युला वन कार रेसर अर्जुर पुरस्कार विजेता गौरव गिलच्या कारने तिघांना चिरडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्जुन पुरस्कार विजेता फॉर्म्युला वन कार रेसिंग ड्रायव्हर गौरव गिलच्या गाडीला स्पर्धेदरम्यान अपघात झाला. नॅशनल रॅली चॅम्पियनशिप स्पर्धेवेळी ट्रॅकवर आलेल्या दुचाकीला धडक बसल्याने एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात गौरव गिल जखमी झाला आहे. गौरव गिलला नुकताच अर्जुन पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार पटकावणारा तो पहिलाच चालक ठरला होता. याप्रकरणी पोलिसांनी गौरव गिल विरोधात हिट अ‍ॅंड रन चा गुन्हा दाखल केला आहे.
Gaurav Gill

शनिवारी एफएफएससीआय इंडियन रॅली चॅम्पियनशिप 2019 च्या शर्यतीवेळी हा अपघात झाला. होतरडा गावाजवळ ट्रॅकवर समोरून आलेल्या दुचाकीनं धडक दिली. तहसीलदार राकेश जैन यांनी सांगितले की, या अपघातात नरेंद्र, त्याची पत्नी पुष्पा आणि त्यांचा मुलगा जितेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. तर गौरव गिल देखील अपघतात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्याचा सहचालक मुसा शेरिफ याला कोणतीही दुखापत झालेली नाही. गौरव गिल फिनिश लाईन पासून अवघ्या 200 मिटरवर असताना हा अपघात झाला.

एफएफएससीआय अध्यक्ष आणि स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पृथ्वीराज यांनी सांगितले की, आम्ही सुरक्षेचे सगळ्या उपाय योजना केल्या होत्यात. पण, दुचाकी घेऊन आलेल्या लोकांनी अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घातली आणि रेसिंग ट्रॅकवर आले. अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण स्पर्धक वेगात फिनिश लाईनच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला.

Visit :- policenama.com