Barsu Refinery Survey | बारसूमध्ये पोलीस व आंदोलकांमध्ये पुन्हा राडा, पोलिसांकडून आदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – बारसू रिफायनरी प्रकल्पाचा (Barsu Refinery Survey) वाद आता चांगलाच चिघळला आहे. शुक्रवारी (दि.28) सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कर्मचारी आणि आंदोलकांमध्ये झटापट (Barsu Refinery Survey) झाली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या (Tear Gas) नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज (Lathi Charged) केला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे बारसु येथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारसू परिसरात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Survey) स्थानिकांचा विरोध असून आज तो अधिक तीव्र झाला. भू सर्वेक्षणासाठी (Land Survey) विरोध झाल्यानंतर प्रशासनाने आक्रमक होत महिलांसह प्रकल्प विरोधातील महत्त्वाच्या लोकांना अटक (Arrest) केली. त्यानंतर राजापूरमध्ये लोकांमध्ये आणखी राग निर्माण झाला होता. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना अटक केल्यानंतर विरोध मावळेल अशी आशा असताना आज आंदोलनामुळे वेगळे वळण लागलं आहे.

अश्रु धुराचा वापर केला नाही – उदय सामंत

दरम्यान, अश्रु धुराचा वापर करण्यात आलेला नाही. आंदोलनकर्त्यांनी तो वणवा लावण्याचा प्रयत्न केला आहे तो विझवताना धूर येत आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी केला आहे. हे स्थानिकांचे आंदोलन नाही. मला हात जोडून सर्वांना विनंती करायची आहे की तुमच्या मताच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांची डोकी भडकवू नका. माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी (CM) मला सांगितले आहे की आपण चर्चेसाठी तयार आहोत. प्रकल्पाला विरोध का आहे हे समजून घेऊ. मातीचे परिक्षण झाले म्हणजे आज उद्या प्रकल्प येणार नाही. स्थानिकांचा विरोध कमी होत असताना काही लोकांनी पक्षीय राजकारणाला स्थानिकांचे रुप देऊन हे आंदोलन केले जात असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

विनायक राऊतांसह 8 जण ताब्यात

कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून याठिकाणी मनाई आदेश
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून लागू करण्यात आला आहे. मात्र मनाईचा आदेश असताना देखील बारसू येथील
आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group)
खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांना पोलिसांनी पुढे जाऊ दिले नाही.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी (SP Dhananjay Kulkarni) यांनी विनायक राऊत यांना पुढे न जाण्याची
विनंती केली. मात्र, राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रमस्थांसमवेत ठिय्या आंदोलन सुरु केले.

अखेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिसांनी खासदार विनायक राऊत,
ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे (Sudhir More), जिल्हाप्रमुख विलास चाळके (Vilas Chalke),
तालुका प्रमुख कमलाकर कदम (Kamlakar Kadam), विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे
(Chandraprakash Nakashe), उपशहर प्रमुख रामचंद्र सरवणकर (Ramchandra Saravankar),
विद्याधर पेडणेकर (Vidyadhar Pednekar) यांना ताब्यात घेतले. तर प्रकल्प विरोधी संघटनेचे अशोक वालम (Ashok Valam) यांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले आहे.

Web Title :- Barsu Refinery Survey | barsu refinery dispute clashes between police and protesters at ratnagiri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | गायब झालेल्या फाईल आणि बंगल्यांची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? (व्हिडिओ)

Maharashtra Politics News | सुप्रिम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, अ‍ॅड. आशिष गिरी यांची ‘ती’ याचिका फेटाळली

Maharashtra Politics News | ‘हपापलेपणा कोण करतंय?’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ ट्विटवर ठाकरे गटाचा पलटवार