Kirit Somaiya | गायब झालेल्या फाईल आणि बंगल्यांची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? (व्हिडिओ)

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वत:चे 19 बंगले गायब केल्याचा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणात गायब झालेल्या फाईलची आणि गायब झालेल्या बंगल्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. सोमय्या यांच्या मागणीमुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कथित 19 बंगले प्रकरणावरुन किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:चे 19 बंगले गायब केले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून स्वत:च 15 जानेवारी 2021 ला चौकशीचे आदेश दिले. चौकशी कुणी करायची, कशी कारायची, कुठे करायची, काय करायची हे उद्धव ठाकरे यांनीच ठरवले. त्यानंतर चौकशीच्या नावाने बंगले गायब झालेल्या जागेचे फोटोसेशन करायचे आणि त्याचा रिपोर्ट मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आला असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

या प्रकरणात गायब झालेल्या फाईलची आणि 19 बंगल्यांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी,
अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ
होण्याची शक्याता आहे.

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiyas serious allegations against uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – तिप्पट पैसे परत केल्यानंतरही दिली जीवे मारण्याची धमकी; बेकायदा सावकारी करणार्‍याला अटक

Pune Fire News | स्वारगेट बसस्थानकाजवळील हातगाडीवरील सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाने वेळेत आग विझवून टाळला मोठा अनर्थ

Karnataka Elections 2023 | कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी 2500 कोटींचा लिलाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप