PUBG प्रेमींसाठी खुशखबर ! Battlegrounds Mobile India साठी सुरु झाले प्री-रजिस्ट्रेशन; या पध्दतीनं करा रजिस्टर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – PUBG च्या ऑनलाईन गेमचे अनेक चाहते आहेत. मात्र, भारतात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या गेमवर बंदी आणण्यात आली. पण आता PUBG पुन्हा भारतात एंट्री करणार असल्याचे सांगण्यात आले असताना ‘Battleground Mobile India’ साठी प्ले स्टोअरवर प्री-रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले आहे.

भारतात PUBG ची पुन्हा एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, आता हीच गेम ‘Battleground Mobile India’या नव्या नावाने लाँच होत आहे. PUBG मोबाईल गेमच्या इंडियन व्हर्जनचे नाव आणि पोस्टर यापूर्वी समोर आले होते. PUBG कॉर्पोरेशन भारतात ‘Battleground Mobile India’या नावाने PUBG गेम लाँच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Battlegrounds Mobile India साठी 18 मे म्हणजे आजपासून प्री-रजिस्ट्रेशन होत आहे. या गेमला Krafton ने डेव्हलप केले आहे. हा गेम PUBG मोबाईलच्या रिप्लेसमेंटमध्ये पाहिला जात आहे.

असे करा रजिस्ट्रेशन…

– Google Play Store वरून Battleground Mobile India सर्च करा

– त्यानंतर तुम्हाला गेम दिसेल. त्यावर Coming Soon हे दिसेल. त्यावर क्लिक करा आणि प्री-रजिस्ट्रेशन लिंकवर टॅप करा. पण डेव्हलपर्स Krafton असावा.

– गेम सध्या डाऊनलोडसाठी उपलब्ध नाही. ही गेम फक्त प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. म्हणजे जेव्हा गेम सर्वांसाठी सुरु होईल तेव्हा याची माहिती दिली जाणार आहे.

– प्री-रजिस्टर करण्यासाठी युजर्सला चार रिवॉर्ड मिळतील : रिकॉन मास्क, रिकॉन आउटफिट, सेलिब्रेशन एक्सपर्ट टायटल आणि 300 एजी ही नावे नव्या करन्सीशीसंबंधित असेल. हे रिवॉर्ड पॉईंट्स फक्त प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या युजर्सला मिळणार आहे.

– अनेक खेळाडू हा खेळ खेळू शकतील. PUBG सारखेच जो खेळाडू शेवटपर्यंत खेळेल तोच विजेता ठरेल.

18 वर्षांखालील मुलांना बंदी

या नव्या गेममध्ये प्रायव्हसी पॉलिसी आहे. त्यानुसार, 18 वर्षांखालील मुलांना ही गेम खेळण्यास बंदी असेल. पण अशांनी त्यांच्या पालकांची परवानगी घेणे गरजेची आहे. तुम्ही पालकांचा मोबाईल क्रमांक देऊ शकता. त्यानंतर तुम्ही खेळण्यास योग्य असाल तर गेम खेळण्यास अलाऊ केले जाईल.