Dear BCCI, कृपया क्रिकेटपटूंना बळजबरीने शेतकरी आंदोलनावर ट्विट करायला लावू नका

पोलीसनामा ऑनलाईन टीम – नवी दिल्ली: गेल्या दोन अडीच महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चालाही हिंसक वळण लागले. या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. नुकतेच या आंदोलनाला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दिला आहे. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग व पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना भारत सरकारवर टीका केली. यामुळे देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर ‘भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं’, अशा शब्दात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्विट करत आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटिंना फटकारलं. सचिनने केलेल्या ट्विट नंतर सर्वच भारतीय क्रिकेटपटूंनी ट्विटरद्वारे परदेशी सेलिब्रेटींना धारेवर धरलं.मात्र आता भारतीय क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विट मागे बीसीसीआय आणि जय शाह यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यावरून आता शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. कोण काय म्हंटले ते पाहू ………

सर्वात आधी कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली. “आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest या हॅशटॅगसह हे ट्वीट केले.” ही बातमी शेतकऱ्यांच्या निदर्शनाच्या जागेभोवती इंटरनेट बंद करण्याविषयी होती. त्यानंतर नवी दिल्लीच्या आसपासच्या परिसरात इंटरनेट बंद केलं आहे. “मानवाधिकाराचं इथं उल्लंघन होत आहे.असे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पॉर्न स्टार मिया खलिफानं ट्वीट केलं. तसेच आणखी एक ट्विट करत तिनं काही कलाकारांना टार्गेट केलं. पेड ऍक्टर्स… मला खात्री आहे की, पुरस्कारांच्या मोसमात यांच्या नावाला डावललं जाणार नाही. मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे असं या ट्विट मध्ये मिया खलिफानं म्हंटल आहे.

अमेरिकन मॅगझिन टाईम्सने २०१९ मध्ये ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले. आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत.असे तिने आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या या ट्विटला चांगलेच फटकारले. यामध्ये सचिन तेंडुलकर पासून ते विराट कोहली पर्यंत सर्वानीच ट्विट केलं आहे. काय म्हंटल आहे, भारतीय क्रिकेटपटूंनी ते पाहू …

सचिन तेंडुलकर: भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. देशातील घडामोडींबाबत बाहेरील लोक प्रेक्षक बनू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ते त्यांनीच ठरवावं. देश हा एकसंध राहिला पाहिजे, एक राष्ट्र म्हणून एकजूटीने राहण्याची गरज आहे, असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे.

त्यानंतर विराट कोहली विराट कोहलीनेही ट्विट केले असून त्यामध्ये त्याने या कठीण प्रसंगात आपण एकजूटीने राहण्याची गरज आहे. आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण घटक शेतकरी असून या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. तोपर्यंत आपण शांतता राखणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे.


अजिंक्य रहाणेने कोणत्याही समस्येवर एकजूटीने तोडगा निघतो. त्यामुळे एकजूटीने राहू आणि आपले अंतर्गत प्रश्न सोडवू. असे म्हंटले आहे रोहित शर्मा म्हणाला कि, आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे देश कायमच मजबूत राहिला आहे. सध्याच्या कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची कायम महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू.


देशात काही समस्या असतात त्याची उत्तरे आज ना उद्या मिळू शकतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की बाहेरच्यांनी हस्तक्षेप करावा, अशा शब्दात रैनाने परदेशी सेलिब्रेटींना फटकारलं आहे. तर अनिल कुंबळेनेही जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत आपले अंतर्गत प्रश्न शांतपणे सोडवण्यास सक्षम आहे.


सध्या आपल्या एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं खूपच आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं. असं ट्विट शिखर धवनने केलं असून एकजूटीने राहू… असं हार्दिक पांड्याने म्हंटल आहे.
आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न बाहेरच्या शक्ती करत आहेत असे गौतम गंभीरने म्हंटले असून अनेक दशकं त्यांनी आपल्यावर राज्य केलं. पण भारताने सगळ्यावर मात केली आणि पुढेही करेल. तुमची अब्जावधीची संपत्ती वापरा…सर्वश्रेष्ठ प्रयत्न करा तरी फरक पडणार नाही. कारण, हा नवीन भारत आहे. असंही गम्भीरने म्हंटल आहे.


या सर्व घडामोडीवर बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावर भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी टीका केली आहे. जय शाह यांना टॅग करत “कृपया बीसीसीआयसोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंच्या अकाउंटवरुन ट्विट करु नका. तसंच अमित शाह यांना शेतकऱ्यांची लवकर भेट घ्यायला सांगा व काळा कायदा रद्द करायला सांगा” असंही श्रीनिवास बीवी यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनीहि भारतीय क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विटवर आक्षेप घेतला आहे. सचिन, कुंबळेपासून ते विराट कोहली हार्दिक पाड्यापर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंनी ट्विट्स कसेकाय केले असा सवाल करत यापाठीमागे बीसीसीआय असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. प्रिय बीसीसीआय, कृपया आपल्या क्रिकेटपटूंना बळजबरीने शेतकरी आंदोलनावर ट्विट करायला लावू नका…हे खूप बालिश दिसतं, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.