Beed ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ व एजंट अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जळालेले मीटर बदलून नवीन मीटर बसवून दिल्याच्या मोबदल्यात वीस हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या (Accepting Bribe) महावितरण कंपनी (MSEDCL) परळी कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) आणि एजंटला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Beed ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल ज्ञानोबा नागरगोजे (वय 29), एजंट वृक्षराज लक्ष्मण काळे (वय 35 दोघे रा. टोकवाडी, ता. परळी, जि. बीड) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. बीड एसीबीच्या पथकाने (Beed ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.6) केली.

याबाबत 30 वर्षाच्या व्यक्तीने गुरुवारी (दि.5) बीड एसीबीकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावे असलेले घरगुती विद्युत मीटर जळल्याने हे मीटर बदलून नवीन मीटर बसवून दिल्याचा मोबदला व यापुढे जास्त बिल येऊ न देण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल नागरगोजे यांनी 20 हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत गुरुवारी बीड एसीबीकडे (Beed ACB Trap) तक्रार केली.

बीड एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पडताळणी केली असता वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल नागरगोजे याने नवीन मीटर
बसवून दिल्याच्या मोबदल्यात व यापुढे जास्त बिल येऊ न देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपये लाच
मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम स्वीकारताना एजंट वृक्षराज काळे याला पथकाने रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे (DySP Shankar Shinde)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस (Police Inspector Amol Dhas),
पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी (Police Inspector Ravindra Pardeshi),
पोलीस अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी, श्रीराम गिराम, चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Beed ACB Trap | Senior technicians and agents of Mahavitran in the anti-corruption net while accepting a bribe of 20 thousand rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Railway Bharti | राज्यातील दहावी पास तरूणांसाठी सेंट्रल रेल्वेकडून मोठे गिफ्ट; २४२२ जागांसाठी लवकरच होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पध्दत

Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ आशयाचे स्टिकर