Beed Crime News | भाजप नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर रॉडने हल्ला, गंभीर जखमी

माजलगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime News | आज सकाळी साडेदहाच्या सुमारास माजलगाव येथील भाजप नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर शाहुनगर या ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील शिवतीर्थ हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरु आहेत.

भाजप नेते अशोकराव शेजुळ हे स्कूटीवरून जात असताना शाहूनगर येथे मोटरसायकलवरून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर रॉडच्या सहाय्य्यने हल्ला केला. हल्लेखोरांनी रॉडच्या साह्याने त्यांच्या हातापायावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा पाय मोडला असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

यानंतर त्यांना उपचारासाठी शहरातील शिवतीर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
या हल्ल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. शेजुळ यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला.
त्या ठिकाणी जाऊन पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी शेजुळ यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे.

Web Title :- Beed Crime News | attack on bjp leader ashokrao shejul by unknown persons beed crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा, संजय राऊतांचे शिंदे गटाला थेट आव्हान

Chhatrapati Sambhajinagar Crime News | लहान मुलांच्या भांडणामध्ये मामाला गमवावा लागला जीव; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Pune Crime News | खळबळजनक ! पुण्यातील राजकीय नेत्याच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी; मागितली 30 लाखांची खंडणी