Beed Crime News | क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून पतीकडून पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीडमध्ये (Beed Crime News) एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नीची धूणी धुण्याचा दगड डोक्यात घालून निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. हि घटना (Beed Crime News) गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी आक्रमक होत पती, दीर आणि पुतण्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सविता सुरेश उर्फ चिंतेश्वर राठोड Savita Chinteshwar Rathod (वय वर्ष 38) असे मृत महिलेचे नाव आहे. ते गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी (Bhend Takli) या गावातील तांड्यावर राहतात. राठोड कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी कर्नाटक येथील एका कारखान्यावर ऊस तोडणीचे काम करतात. सध्या ते आपल्या गावी नातेवाईकाच्या लग्नासाठी गेवराई येथील भेंड टाकळी या ठिकाणी आले होते. तीन दिवस लग्न समारंभ आटोपल्यानंतर पत्नीने पतीला आपण उचललेली जी उचल आहे ती तुम्ही खर्चून का टाकली असा जाब विचारला. आपल्याला जाब विचारला म्हणून पतीला राग आल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हा वाद इतका टोकाला गेला कि पती चिंतेश्वर राठोड ( Chinteshwar Rathod) याने पत्नीच्या डोक्यात धुणी धुण्याचा दगड घालून तिला जखमी केले.
यानंतर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
यानंतर रुग्नालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मृत महिलेच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्र घेत महिलेचा पती, दीर आणि पुतण्या या तिघांवर खुनाचा गुन्हा
दाखल करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पती, दीर आणि पुतण्या यांच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मृत महिलेवर शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या
गावी पाठवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title :- Beed Crime News | husband killed wife hitting by stone in her head shocking incident in beed
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Symptoms Of Stress | तणाव घेतल्याने वाढतो ‘या’ 2 गंभीर आजारांचा धोका; जाणून घ्या