7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ‘गिफ्ट’; महागाई भत्त्यात होऊ शकते मोठी वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे गेल्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला गेला नाही. पण त्यानंतर या वाढीच्या प्रतिक्षेत असलेले केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांची इच्छा आता पूर्ण होऊ शकते. कारण येत्या होळीपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्या वाढ दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून दिली जात आहे.

होळीच्या पूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळू शकते. मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करू शकते. यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होऊ शकणार आहे.

महागाई भत्त्यात वाढ करु शकते सरकार
‘ऑल इंडिया कंज्युमर प्राईस इंडेक्स’च्या घोषणा आणि संसदेत केंद्रीय बजेट 2021 सादर झाल्यानंतर महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याचा परिणाम आणखी वाढला आहे. सरकार महागाई राहत भत्त्यात 4 टक्के वाढवू शकते. याशिवाय इतरही भत्त्यांचे पेमेंट देऊ शकते.

गेल्या वर्षी सरकारने रोखली होती वाढ
अर्थ मंत्रालयाने एप्रिल 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांसाठी जुलै 2021 पर्यंत महागाई भत्त्यात वाढ रोखण्याचा निर्णय घेतला होता. पण आता सरकारकडून या सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ करून ‘गिफ्ट’ दिले जाणार आहे.