belgaon news | दुर्दैवी ! चौघे भाऊ कृष्णा नदीत बुडाले, बेळगाव जिल्ह्यातील घटना

बेळगाव न्यूज (Belgaon News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  बेळगाव जिल्ह्यातून (Belgaum district) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेले चौघे भाऊ (Four brothers) नदीत बुडाले आहेत. हल्याळ (ता. अथणी) येथे सोमवारी (दि. 28) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलीस अन् अग्निशमन दल (Fire brigade) बुडालेल्या चौघांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. belgaon news | four brothers drowned in the river krishna

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

गोपाळ बनसोडे (वय 36), सदाशिव बनसोडे (वय 24), दरेप्पा बनसोडे (वय 22) आणि शंकर बनसोडे (वय 20 सर्व. रा. हल्ल्याळ, ता. अथणी ) अशी त्‍यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, हल्याळ गावची जत्रा असल्याने गावातील लोकांनी सारे कपडे आणि बिछाने धुवायला काढले आहेत.
गावातील बनसोडे कुटुंब कपडे धुण्यासाठी नजीकच्या कृष्णा नदीवर गेले होते.
कपडे धूताना सदाशिव यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले आणि बुडाले.
त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या तिघा भावांनी एका पाठोपाठ एक नदीत उडी घेतली.
पण ते तिघेही नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थानी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावण्यात आले असून चौघांचा भावंडाचा शोध सुरु आहे.

Web Title : belgaon news | four brothers drowned in the river krishna

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | मित्रासोबत फिल्मी स्टाईल ‘एक एकाच्या डोक्यात कोयते अडकवणार’ म्हणणारा अटकेत