बेल्जियमची फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक

मॉस्को वृत्तसंस्था:

फुटबॉल विश्वचषकात बलाढ्य समजला जाणाऱ्या ब्राझीलच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. बेल्जीयम ने ब्राझीलचा २-१ असा पराभव केला आहे. बेल्जियमनं ब्राझीलचं आव्हान मोडीत काढून, फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.हा सामना कझान शहरात खेळला गेला. गेल्या ३२ वर्षातील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची बेल्जियमची ही दुसरी वेळ आहे. ब्राझीलच्या फर्नांडिन्होनं तेराव्या मिनिटाला केलेला स्वयंगोल ब्राझीलला महागात पडला.

सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ आक्रमक खेळ खेळत होते. ब्राझीलच्या फर्नांडिन्होनं पहिला गोल करून बेल्जियमचं खातं उघडलं. त्यानंतर दहा मिनिटातच बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूनं दिलेल्या पासवर केविन डी ब्रॉयनानं 33 व्या मिनिटाला गोल केला. आणि बेल्जियमच खात जड झालं, पण ब्राझीलला खेळाच्या मध्यंतरापर्यंत एकही गोल करता आला नाही.

[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a03ee99d-81a3-11e8-84e6-6569c9c0549f’]

मध्यांतरानंतर ब्राझीलनं सातत्यानं गोल करून खेळ बरोबरीत आणण्याचा खूप प्रयत्न केला.पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला.ब्राझीलच्या रेनोटो ऑगोस्टोने 78 व्या मिनिटाला पहिला गोल केला. सामन्याचा 90 मिनिटांचा खेळ संपला तेव्हा बेल्जियमच्या संघाने 2-1 ने आघाडी ठेवली होती. त्यानंतर 5 मिनिटांचा अधिकचा वेळ दोन्ही संघासाठी देण्यात आला. परंतु ब्राझीलला मिळालेल्या अधिकच्या वेळेत सुद्धा गोल करता आला नाही.

1986 नंतर बेल्जियमला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती. ३२ सालानंतर बेल्जियमनं उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर यंदा बेल्जियमनं ब्राझीलला हरवून उपांत्य फेरी गाठली. तर ब्राझीलच्या पराभवामुळे त्यांच्या चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. या स्पर्धेतून ब्राझीलचा संघ बाहेर पडल्यामुळे यंदा फिफा वर्ल्डकप कोण जिंकणार याबद्दलची उत्सुक्ता अधिक वाढली आहे.