गाजराचा हलवा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गाजर म्हटल की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. तसेच गाजराचा वापर पुलाव, भाज्या, सॅलेड आणि सूप तयार करण्यासाठी केला जातो. थंडीच्या दिवसात गाजराचा हलवा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कारण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फ्रुट्स, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो. गाजरात अनेक पोषक तत्व असतात. तसेच कॅन्सर, हृदयरोग, त्वचा, डोळे आदी विकारावर गाजरं उपयुक्त ठरते. ही बहुगुणी फळभाजी शरीरातील विविध अवयवांसाठी कशी पोषक आहे, हे आज आम्ही सांगणार आहोत.

कॅन्सरपासून बचाव :
गाजरामध्ये कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्याचेही गुण आहे. यातील कॅरोटिनाईड नावाचे तत्त्व असते जे प्रोस्टेट, कोलोन आणि स्तन कॅन्सरशी लढण्यासाठी सक्षम आहे. गाजर खाल्ल्याने आतडीचा कॅन्सर कमी होण्याचे प्रमाण सुमारे 24 टक्क्यांपर्यंत कमी होते.

हृदयरोगींसाठी फायदेशीर :
गाजरामधील कॅरोटिनॉईड तत्त्व हृदयरोगींसाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे गाजराच्या रोजच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

त्वचेसाठी फायदेशीर :
रोजच गाजराचे सॅलेड खाल्ल्याने किंवा गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर चकाकी येते. गाजराच्या सेवनाने रक्तातील विषाची मात्रा कमी होते. त्यामुळे मुरूमे-पुटकुळ्या इत्यादींपासून सुटका मिळते.

डोळ्यांचे आरोग्य :
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते. शिवाय यातील बीटा-केरोटिन आणि पोटॅशियमदेखील असल्याने शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

गाजराचे अन्य फायदे
गाजरच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ‘के’ असते, ज्यामुळे रक्त गोठण्यास मदत होते आणि रक्तस्त्राव थांबतो. गाजरमधील विटॅमिन ‘सी’ मुळे जखम ठीक होण्यास मदत होते. शिवाय हिरड्यादेखील स्वस्थ राहतात. गाजरमधील बीटा कॅरोटीनमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.