वात अन् कफावर गुणकारी ठरतो लसूण ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  स्वयंपाक घरातील अनेक पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे लसूण. लसणाचे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) रक्तदाब, हृदयविकार अशा अनेक रोगांवर लसूण खूप उपयोगी ठरतो.

2) शरीरासाठी गरजेचं असणारं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास याची खूप मदत होते.

3) कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणधर्मदेखील लसणात असतात.

4) लसणामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

5) लसणामुळं हवेतील रोगजंतू नाहीसे होण्यासही मदत होते.

6) लसूण नकारात्मक ऊर्जा खेचून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो असंही सांगितलं जातं. हेच कारण होतं की, पूर्वीचे लोक झोपताना उशीखाली लसूण ठेवत असत.

7) लसूण हा उष्ण आणि तीष्ण गुणधर्माचा आहे त्यामुळं तो वात आणि कफनाशक आहे.

8) पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करतो.

9) लसणात अ‍ॅलिसिन नावाचं औषधी तत्व असतं. त्यामुळं बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू संसर्ग बरा होण्यास मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.