Benefits Of Soaked Dry fruits | जाणून घेऊया सुकामेवा भिजवून खाण्याचे जबरदस्त फायदे…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | भिजवलेला सुका मेवा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो (Benefits Of Soaked Dry fruits). ड्रायफ्रूट भिजवल्यामुळे त्यातील फायटिक ऍसिड चे (Phytic Acid) प्रमाण कमी होते. यामुळे हे सहज पचण्यास मदत होते. यासोबतच ते भिजत ठेवल्याने त्यांच्यामध्ये असलेले हानिकारक प्रिझर्वेटिव्ह सुद्धा नष्ट होतात (Benefits Of Soaked Dry fruits).

आपण बदाम (Almonds), अक्रोड (Walnuts), अंजीर (Figs) आणि मनुका (Raisins) यांसारखी सुकी फळे भिजवून खाऊ शकतो. मात्र दुसरीकडे, काजू (Kaju), पिस्ता (Pishta) आणि खजूर (Dates) यांसारखी सुकी फळे भिजवून खाऊ नयेत.

ड्रायफ्रूट्सना भिजवून ठेवल्याने ते अंकुरित होतात. त्यामुळे त्यांची न्यूट्रीशनल वैल्यू वाढते. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात (Soaked Dry Fruits Benefits).

तुम्ही ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ले तर तुमची पचनक्रिया निरोगी राहते. याशिवाय ड्रायफ्रूट्स रात्रभर भिजवून सकाळी
खाल्ल्याने तुमचे आरोग्य सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या (Effective For Constipation) समस्येपासून आराम
मिळतो (Benefits Of Soaked Dry fruits).

ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने तुमचा मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन्स (Vitamins)
आणि मिनरल्स (Minerals) तुमच्या मेंदूला निरोगी (Brain Health) ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

सुक्या मेव्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात.
हे तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात (Beneficial To Weight Loss).

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | काँग्रेस नागपुरातून फुंकणार लोकसभेचे रणशिंग, महारॅलीसाठी नेत्यांची लगबग

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : मोबाईल लोन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, एकाला अटक

Pune Police-Tarang 2023 | तरंग-2023: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा; सोहळ्यासाठी मोफत प्रवेश असणार

Ravikant Tupkar | सरकारच्या बुडाखाली आग लावणार, हजारो शेतकरी नागपुरच्या विधानभवनात घुसणार, रविकांत तुपकारांचा इशारा

49 Opposition MP Supspended | विरोधी खासदारांवर निलंबनास्त्राचा मारा ! सुप्रिया सुळे, शशी थरूरांसह 49 जण निलंबित, आतापर्यंत 141 जण ‘आऊट’