49 Opposition MP Supspended | विरोधी खासदारांवर निलंबनास्त्राचा मारा ! सुप्रिया सुळे, शशी थरूरांसह 49 जण निलंबित, आतापर्यंत 141 जण ‘आऊट’

नवी दिल्ली : 49 Opposition MP Supspended | संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी सरकारला (Modi Govt) धारेवर धरले आहे. गृहमंत्री अमित शहांनी (Home Minister Amit Shah) दोन्ही सभागृहात निवेदन करावे, या मागणीसाठी विरोधक मागील आठवड्यापासून आक्रमक झालेत. मात्र, सरकारने या गदारोळात निलंबनास्त्राचा मारा सुरू केला आहे. आज पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन (49 Opposition MP Supspended) केल्यानंतर देशात मोठा गोंधळ उडाला आहे. या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) आणि काँग्रेसचे शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) यांचा समावेश आहे. (parliament Winter Session 2023)

सर्वात धक्कादायक म्हणजे आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या १४१ पर्यंत पोहोचली आहे. आज पुन्हा गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षाभंगावरून निवेदन करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी गोंधळ घातला. यानंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ४९ खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले राजेंद्र अग्रवाल यांनी मंजूर केला.

आज खासदार शशी थरूर, मनिष तिवारी, कार्ति चिदंबरम, एम. डी फैजल, फारूक अब्दुल्ला, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, दानिश अली, माला रॉय, डिपंल यादव, सुशील कुमार रिंकू यांच्यासह ४९ जणांना निलंबित केले आहे. (49 Opposition MP Supspended)

असे झाले १४१ खासदारांचे निलंबन

  • शुक्रवार (१५ नोव्हेंबर) – लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील १ खासदाराचे निलंबन
  • सोमवार (१८ नोव्हेंबर) – लोकसभेतील ३३, तर राज्यसभेतील ४५ अशा ७५ खासदारांचे निलंबन
  • मंगळवार (१९ डिसेंबर) – लोकसभेतील ४९ खासदारांचे निलंबन

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Google वर उच्चभ्रू परिसर सर्च करुन घरफोडी, येरवडा पोलिसांकडून परराज्यातील हायटेक चोरट्याला अटक; 3 गुन्हे उघड

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून, पतीला अटक; पिंपरी चिंचवडमधील घटना

NCP MP Supriya Sule | जनतेचा आवाज दडपाण्याचे पाप हे सरकार करतंय, ही तर अघोषित आणीबाणी : सुप्रिया सुळे