अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वज्र म्हणजे इंद्राचे अस्र या आसनात पायची पकड पक्की असते. म्हणून याला वज्रासनही म्हणतात. तसेच याला जननेंद्रिय असेही म्हणतात. अनेकांना अपचनाची समस्या असते. ज्यांना खाल्लेलं व्यवस्थित पचन होत नाही. त्यांच्यासाठी हे आसन अतिशय फायद्याचे आहे. ज्यांना या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तयार त्यांनी हे आसन जरूर करावे.

 वज्रासनाचे फायदे खालीलप्रमाणे 
१) हे आसन आपण जेवणानंतरही करू शकतो. या आसनाने अन्नपचन व्यवस्थित होते. तसेच शरीर बळकट आणि स्थिर बनते. याने पाठीचे हाडे आणि खांदा सरळ होतात. या आसनाने श्वासाची गती मंद झाल्याने आयुष्य वाढते. याचबरोबर हे आसन केल्याने पायाचे सांधे बळकट बनतात.

२) हे आसन दररोज केल्याने पाठीचा कणा आपोआप सरळ होतो. त्यामुळे हे आसन खूप फायद्याचे आहे.

३) हे आसन महिलांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. कारण हे आसन केल्याने मासिक पाळीत होणारा त्रास कमी होतो.

४) आपल्याला सकाळी सकाळी आसन करायला वेळ नसतो. जेवणानंतर आपण जेव्हा फ्री होतो. तेव्हा आसन करता येत नाहीत. पण वज्रासन हे एकमेव आसन आहे. कि ते जेवल्यानंतर करता येते.