Bengal SSC Scam | माझ्या घराचा मिनी बँकप्रमाणे वापर करत होता पार्थ चटर्जी – अर्पिता मुखर्जीचा दावा

कोलकाता : वृत्तसंस्था – Bengal SSC Scam | बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेली अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) हिने दावा केला आहे की टीएमसी (TMC Minister) मंत्री पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) तिच्या घरी पैसे ठेवायचे आणि ते ‘मिनी-बँक‘ म्हणून घर वापरायचे. एनडीटीव्हीच्या वृत्तात सूत्रांच्या संदर्भाने असे म्हटले आहे की अर्पिता मुखर्जीने अंमलबजावणी संचालनालयाला सांगितले आहे की, सर्व पैसे एका खोलीत ठेवले जात होते, ज्यामध्ये केवळ पार्थ चॅटर्जी आणि त्याची माणसे आत जात असत. (Bengal SSC Scam)

 

सूत्रांनी असेही सांगितले की, अर्पिता मुखर्जी यांनी दावा केला की, मंत्री दर आठवड्याला किंवा दर 10 दिवसांनी त्यांच्या घरी जात असे. पार्थने माझे घर आणि दुसर्‍या एका महिलेचे घर मिनी बँक म्हणून वापरले. ती दुसरी महिला सुद्धा त्याची जवळची मैत्रीण आहे. (Bengal SSC Scam)

 

शिक्षक भरती घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्याची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली आहे. सोमवारी कोलकाता ईडी न्यायालयाने दोघांनाही 10 दिवसांची कोठडी सुनावली. ईडीने चॅटर्जीची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती.

 

दोषींना शिक्षा मिळावी, न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास
त्याचवेळी मंत्री पार्थ चॅटर्जीच्या अटकेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) म्हणाल्या
की, जर कोणी चुकीचे काम करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
एक कालमर्यादा असावी ज्यामध्ये सत्य आणि न्यायालयाचा निर्णय बाहेर यावा. कोणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे.
पक्ष कारवाई सुद्धा करेल. पण, मी माझ्याविरुद्ध चालवलेल्या द्वेषपूर्ण मोहिमेवर टीका करते.

 

मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेनंतर भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्ष टीएमसीविरोधात आघाडी उघडली आहे.
बंगालमध्ये सरकारी पैशांची लूट सुरू असल्याचे भाजप नेते सांगत आहेत.
त्याचवेळी भाजप नेते दिलीप घोष (BJP leader Dilip Ghosh) यांनीही सीएम ममता बॅनर्जी यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

Web Title :- Bengal SSC Scam | bengal ssc scam arpita mukherjee says partha chatterjee used to use my house as a mini bank crs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली ? उद्धव ठाकरेचं भाजपकडे बोट

 

SBI Best Investment Scheme | एसबीआयच्या टॉप 5 स्कीम ! येथे 1 लाखाचे झाले 9.5 लाख, 10 वर्षात 857% पर्यंत मिळाला रिटर्न

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | पुण्यवान होण्यासाठी भाजपमध्ये जा, मुलाखतीतच उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला?