पैशातूनच बनतात पैसे, गुंतवणूकीच्या या 5 पध्दती, आजच आपल्यासाठी निवडा, जाणून घ्या

नवी दिल्ली : गुंतवणुकीच्या अनेक पद्धती असतात. काही लोक चांगल्या रिटर्नसाठी थोडी जोखीम घेण्यास तयार असतात, तर काही लोकांना रिटर्न थोडे कमी मिळाले तरी चालते, पण जोखीम घेत नाहीत. अशावेळी प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतात. जेथे ते आपल्या सुविधेनुसार गुंतवणूक करू शकतात.

फेब्रुवारीत कोरोना व्हायरसची चाहूल लागल्याने शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू झाले ते मार्चमध्ये आणखी वाढले होते. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला या महामारीने झटका दिला आहे. इतकेच नव्हे, काही लोक अजूनही शेअर बाजाराला घाबरलेले आहेत. मात्र, मार्चपासून सातत्याने शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. अशावेळी नवीन वर्षात कुठे गुंतवणूक करायची, कुठे पैसे सुरक्षित राहतील आणि रिटर्न चांगले मिळेल. हे मोठे प्रश्न आहेत. आम्ही आपल्याला गुंतवणुकीच्या 5 पद्धती सांगणार आहोत, जिथे तुम्ही नवीन वर्षात गुंतवणूक करू शकता. परंतु, कुठेही गुंतवणुकीपूर्वी जोखीमबाबत जाणून घ्या.

शेअर बाजारात गुंतवणूक :
जर तुम्ही थोडी जोखीम घेण्यास तयार आहात, तर शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठी रक्कम कमावू शकता. सध्या शेअर बाजारात दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी पैसे लावण्याची योग्य वेळ आहे. जाणकारांनुसार बाजारात तेजीचा कल पुढेही जारी राहील. मात्र, शेअर बाजारात गुंतवणुकीपूर्वी आर्थिक जाणकारांचा सल्ला घ्या.

म्युच्युअल फंड :
कोरोनाची प्रकरणे कमी होताच म्युच्युअल फंडात आणखी तेजी दिसू शकते. काही म्युच्युअल फंडने कोरोना संकटातसुद्धा चांगले रिटर्न दिले आहे. इतकेच नव्हे, मागील सुमारे 20 वर्षांत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातून भरपूर पैसे कमावले आहेत. यासाठी म्युच्युअल फंड चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु यासाठी योग्य फंडची निवड महत्त्वाचे ठरते.

सोन्यात गुंतवणूक :
कोरोना संकटात गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात पैसे लावले. नेहमीच जेव्हा आर्थिक मंदीची चाहूल लागते, तेव्हा सोने गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरतो. आता गोल्ड आपल्या उच्च स्तरापासून 10 टक्केने जास्त खाली आहे. परंतु, मागील एक वर्षात सोन्याने सुमारे 30 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिले आहे. मात्र, फिजिकली गोल्डमध्ये गुंतवणूक करणे टाळा.

सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक :
पीपीएफसह अनेक सरकारी गुंतवणूक पर्यायसुद्धा तुमच्या समोर आहेत, ज्यामध्ये तुमची गुंतवणूक एकदम सुरक्षित राहील आणि रिटर्नसुद्धा बँक डिपॉझिटच्या तुलनेत जास्त मिळेल. याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करू शकता. जर तुमच्या घरात 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी असेल तर तिच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. मोदी सरकार या योजनेवर चांगले रिटर्न देत आहे. याशिवाय बँक डिपॉझिट नेहमी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ज्यामध्ये रिटर्नबाबत अगोदरच माहीत असते.

प्रॉपर्टीत गुंतवणूक :
2021 मध्ये प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक एक चांगला पर्याय होऊ शकतो. मागील काही वर्षांत प्रॉपटीने गुंतवणूकदारांना निराश केले आहे. परंतु अपेक्षा आहे की, पुढील वर्षी तेजीचे वातावरण राहील, कारण सरकारचा फोकस यावर्षी रिअल इस्टेट सेक्टरवर असू शकतो. मागील सुमारे 4 वर्षांपासून प्रॉपर्टीच्या किमतीत वाढ दिसून आलेली नाही, यासाठी नवीन वर्ष प्रॉपर्टी गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.