Best Type Of Banana For Weight Loss : लाख प्रयत्नानंतर सुद्धा लठ्ठपणा कमी होत नाही का? करा ‘या’ रंगाच्या केळीचं सेवन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : केळे खाल्ल्याने वजन वाढते असे अनेकांना वाटते. परंतु योग्यप्रकारे केळ्याचे सेवन करून तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी केळ्याचा वापर कसा करावा हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर कोणत्या प्रकारच्या केळ्यांचे सेवन करावे ते जाणून घेवूयात…

पिवळी केळी 
पिवळ्या केळ्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद मिळते आणि पचनक्रिया चांगली होते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

ब्राऊन केळे 
केळी खुप दिवस ठेवली की त्यांचा वरील भाग ब्राऊन होतो. ब्राऊन केळ्यात 0.45 ग्रॅम स्टार्च आढळते. ब्राऊन केळ्यात 1.9 ग्रॅम फायबर असते जे आरोग्याला चांगले असते.

हिरवे केळे –
हिरव्या केळ्यात शुगर खुप कमी असते. प्रतिरोधक स्टार्च आढळते जे पचनासाठी चांगले असते. हे सेवन केल्याने लवकर भूक लागत नाही, आणि वजन नियंत्रणात राहते. जर्नल डायबिटीक मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जर तपकीरी रंगाच्या केळया ऐवजी पिवळ्या रंगाचे केळे सेवन केले तर ब्लड शुगर वेगाने वाढत नाही. वजन कमी होते.