ज्योतिष : वास्तुशास्त्रानुसार केवळ घरच नाही तर नशिब देखील चमकते रंगाच्या योग्य वापरामुळे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – घराच्या सजावटीमध्ये आपण रंगांच्या निवडीला प्राधान्य देतो. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास घरातील रंगांचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या आसपास असणाऱ्या रंगांचा व्यक्तीवर शारिरिक आणि मानसिक स्वरूपाचा मोठा प्रभाव पडत असतो. सत्व, रज आणि तामसिक या तिन्ही प्रकारच्या गुणांशी रंगांचा जवळचा संबंध असतो. आकाशी, हिरवा, पांढरा आणि इतर हलक्या रंगांना सत्वगुणी मानले जाते. तर लाल, नारंगी आणि गुलाबी रंग राजसिक गुणाचे समजले जातात ज्यामुळे इच्छा-आकांक्षांमध्ये वाढ होते.

कोणत्या रंगाचा कुठे वापर करावा –

हलक्या निळ्या आणि हिरव्या रंगाला वास्तूमध्ये आरोग्याचा प्राकृतिक स्रोत म्हणून पाहिले जाते. हे रंग थंड आणि कोमल प्रकारचे असतात आणि यांमुळे संयम आणि शांत स्वरूपाची कंपने निर्माण होतात. या रंगांचा उपयोग घराच्या ड्रॉईंग रूम मध्ये करणे योग्य ठरेल. बाथरूम चा रंग हलका निळा असणे वास्तूमध्ये शुभ मानले जाते.

या रंगांचा वापर घरात का करु नये –

गडद प्रकारचे रंग तामसिक स्वरूपाचे असतात. यांमध्ये गडद निळा, भुरका किंवा काळा रंग प्रमुख मानले जातात. घराच्या सजावटीत या रंगांचा वापर कमी आणि काळजीपूर्वक करावा. कारण हे रंग व्यक्तीला सुस्त आणि आळशी बनवतात. घरात सौहार्दयाचे वातावरण राहावे यासाठी नम्र, हलक्या आणि सात्विक रंगांचा वापर करावा.

स्वास्थ्यासाठी ‘हा’ रंग शुभ असतो –

पिवळा रंग व्यक्तीच्या स्नायुतंत्राला संतुलित आणि मस्तकाला सक्रिय ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे या रंगाचा वापर अभ्यासिका किंवा वाचनालयात करणे अत्यंत लाभाचे ठरू शकेल. जांभळ्या रंगास उत्साहवर्धक आणि आळसाचा नाश करणारा मानले जाते त्यामुळे त्याचा वापर योग आणि साधनेच्या कक्षात किंवा पूजेच्या ठिकाणी करणे शुभ मानले जाते.

घराच्या छताला कोणता रंग द्यावा –

घराच्या छतास पांढरा रंग दिल्यामुळे घरामध्ये अधिक उष्णता आणि प्रकाश राहील. पण संपूर्ण खोलीस मात्र सफेद रंग देऊ नये कारण या रंगास अल्पजीवी मानले गेले आहे. गुलाबी, लाल, नारंगी रंग हे रंग जवळीकीच्या संबंधांना सुदृढ बनविणारे मानले जातात. त्यामुळे शयनकक्षात यांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

मुख्य दरवाजाचा रंग कसा असावा –

स्वयंपाकघरात देखील लाल रंग वापरणे लाभदायक असते. तसेच घराच्या मुख्य दाराच्या रंगाची निवड दिशेच्या आधारावर करायला हवी. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होईल आणि वातावरण खुशालीचे राहील.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही