Best Way To Morning Walk | मॉर्निंग वॉकपूर्वी ब्रेकफास्ट करावा की नाही? काय आहे सकाळी फिरण्याची योग्य पद्धत, कोण-कोणते आहेत फायदे

नवी दिल्ली : Best Way To Morning Walk | मॉर्निंग वॉकचे असंख्य फायदे आहेत. परंतु, याची योग्य पद्धत अनेकांना माहित नसते. अनेकजण या कन्फ्यूजनमध्ये असतात की मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी नाश्ता करावा की नाही. तर अनेकांना माहित नसते की, मॉर्निंग वॉकपूर्वी पाणी प्यावे की नाही. जर तुम्हाला सुद्धा मॉर्निंग वॉकची योग्य पद्धत माहित नसेल तर येथे जाणून घ्या. (Best Way To Morning Walk)

मॉर्निंग वॉकपूर्वी ब्रेकफास्ट

हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, काही रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, मॉर्निंग वॉक दरम्यान जर ब्रेकफास्ट केला नाही तर यामुळे जास्त कॅलरी बर्न होतील आणि शरीरातील जास्त चरबी बर्न होईल. (Best Way To Morning Walk)

अन्य एका रिसर्चमध्ये म्हटले आहे की, मॉर्निंग वॉकपूर्वी ब्रेकफास्ट करावा की नाही हे या गोष्टीवर अवलंबून आहे की, तुमचे शरीर कशाप्रकारे सकाळी फिरण्यासाठी अ‍ॅडजस्ट आहे. जर विना ब्रेकफास्ट वॉक केल्याने तुम्ही थकत असाल, खुप त्रास होत असेल तर हलका नाश्ता करणे आवश्यक आहे.

परंतु ब्रेकफास्ट केला नाही तरी कोणताही फरक पडत नसेल तर तो स्किप सुद्धा करू शकता. मात्र, मॉर्निंग वॉकपूर्वी हलका नाश्ता करणे चांगले आहे. यामध्ये तुम्ही एक केळे अथवा काही फळे खाऊ शकता. परंतु जेव्हा वॉकवरून परत येता तेव्हा हेवी नाश्ता आवश्य करा. याशिवाय योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

मॉर्निंग वॉकची योग्य पद्धत

१. योग्य कपडे निवडा –

असे कपडे घाला जे घाम शोषून घेतील. हलके कॉटनचे कपडे घाला जेणेकरून त्वचेसंबंधी कोणतीही अ‍ॅलर्जी होणार नाही. वॉक करताना मोजे घातले नाही तर चांगले ठरेल.

२. हिरवळीच्या ठिकाणी जा –

सकाळी अशा जागेची निवड करा जिथे हिरवळ आणि झाडे-झुडपे आहेत. वॉकदरम्यान केवळ पायीच चालू नका तर
मध्ये-मध्ये एखाद्या झाडाला लटका, थोडे धावा, सोबतच्या लोकांसोबत बोला. जर योगा, मेडिटेशन केले तर आणखी चांगले ठरेल.

३. सामाजिक संपर्क –

मॉर्निंग वॉक दरम्यान जवळपासच्या लोकांशी संपर्क वाढवा. एकमेकांशी बोलल्याने सकारात्मकता वाढेल यामुळे हॅप्पी हार्मोन रिलिज होतील आणि दिवसभर आनंदी रहाल.

४. सतत पाणी पित रहा –

मॉर्निंग वॉक दरम्यान सतत पाणी पीत रहा. यामुळे हायड्रेट रहाल आणि शरीराला आवश्यक एनर्जी मिळत राहील.

५. वॉर्मअप करा –

सकाळच्या फिरण्यापूर्वी ग्राउंडमध्ये पहिल्या पाच मिनिटांसाठी वॉर्मअप करा. यामुळे वॉकसाठी शरीरात एनर्जी राहील आणि शरीर तयार होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sindhudurg Chipi Airport Maharashtra | 1 सप्टेंबर पासून चिपी विमानतळावरून कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार