सौर उर्जेवर स्वयंपाक बनवणाऱ्या ‘या’ गावाचे जिल्हाधिकाऱ्याने केले ‘कौतुक’

बैतुल : वृत्तसंस्था – दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड, वाढते प्रदूषण यामुळे होणाऱ्या विविध आजारांना आळा बसावा म्हणून घरोघरी सौरऊर्जेचा वापर करावा म्हणून सरकार अनेक योजना राबवते. मात्र या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे काही योजना या फक्त योजनाच राहतात. पण मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात बांचा नावाच्या गावात घरोघरी सौर उर्जेवर Cooking

केला जातो. या उपक्रमामुळे या गावाचं बैतुलच्या जिल्हाधिकाऱ्यानी कौतुक केलं आहे.

चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लाकूड लागते. त्यासाठी झाडे तोडावी लागतात. आणि चुलीच्या धुराने प्रदूषणही होत असल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते. यावर उपाय आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून भारतीय शिक्षण समितीचे सचिव मोहन नागर यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती. यात मुंबईच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी सौर उर्जेवरील चुलीच मॉडेल बनवलं होत. आणि याचा कुठे तरी प्रयोग करायचा होता. त्यामुळे भारतीय शिक्षण समितीने दिल्लीच्या पेट्रोलियम मंत्री यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी बांचा या गावाचं नाव सुचवलं.

त्यानुसार सप्टेंबर २०१७ मध्ये गावात सौर ऊर्जा लावायचं काम चालू झालं. आणि २०१८ मध्ये हे पूर्णही झालं. या सोलरवर चांगलं ऊन असेल तर ८०० व्होल्ट लाइट तयार होते. यात लावलेल्या बॅटरीमध्ये ३ युनिट बॅटरी राहते. याच्यावर दिवसातून तीनदा जेवण बनतं. यामुळे विजेची बचत होते, प्रदूषण कमी होत. हे असे उपक्रम गावोगावी राबवले तर प्रदूषणाला लवकर आळा बसेल. आणि लोडशेडिंग चा त्रासही होणार नाही.