US : जो बायडेन यांच्या शपथविधी समारंभातील 150 नॅशनल गार्डचे जवान ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

वॉशिग्टन : राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधी समारंभासाठी वॉशिग्टन डीसी येथे तैनात करण्यात आलेल्या १५० ते २०० नॅशनल गार्डच्या जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

 

 

 

 

 

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्या समर्थकांनी ६ जानेवारी रोजी कॅपिटलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सरकारने शहरात अभूतपूर्व सुरक्षा उपाय योजना आखली होती. त्यामध्ये राष्ट्रीय गार्डने हाताळलेल्या रेझर वायर आणि चौक्यांसह कुंपण घातले होते. शपथविधी समारंभ पार पडल्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत सुमारे १५० ते २०० गार्ड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

अमेरिकेतील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जो बायडेन यांनी आता नव्याने निर्बंध लादण्याचा विचार करीत आहेत.