धक्कादायक ! फक्त 4 ते 6 रूपयांसाठी शाळेकडून विकली जातेय विद्यार्थ्यांची माहिती ‘कोचिंग’ क्लासेसला, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचा फोन नंबर, वेतनाची माहिती, पत्ता, सोशल मीडिया अकाऊंट प्रोफाइल, तसेच तुमच्या मुलाचे नाव याची माहिती तुमच्या मुलांच्या शाळेतून फक्त 4 ते 6 रुपयांना विकली जाते. या सहज उपलब्ध होणाऱ्या माहितीचे गैरवापर करणारे लोक चूकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार ही माहिती मिळत आहे.
चंदीगडच्या सेक्टर 34 मधील कोचिंन सेंटरच्या 14 ते 15 कर्मचाऱ्यांकडून हे काम करण्यात येते. त्यांच्याकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार ते विविध शाळांमधून विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, रोल नंबर, पालकांचा फोन नंबर अशी माहिती जमा करतात.
त्यांनी सांगितले की एका विद्यार्थ्याची माहिती फक्त 4 ते 6 रुपयात मार्केटिंगसाठी जमा केली जाते. काही वेळा ही माहिती एकूण 28 हजार रुपयांपर्यंत जाते. त्यांनी असेही सांगितले की जवळापास 7000 विद्यार्थ्यांचा डाटा 26 विविध शहरातील शाळांमधून जमा करण्यात आला आहे.
हे आंतरराष्ट्रीय कायदा 19 नुसार विद्यार्थ्यांच्या हक्काचे उल्लंघन आहे. जे सांगते की सदस्य असलेल्या देशांनी तपास केला पाहिजे की, तेथे कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्याचे शोषण तर होत नाही.
ज्येष्ठ वकील अरोरा यांनी सांगितले की याद्वारे काही समाज कंटकांकडून विद्यार्थ्यांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांचे स्वरुप समोर आणले जाते, विशेषता विद्यार्थींनींचे. हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहे.
हे धक्कादायक –
जेव्हा विवेक हायस्कूलशी ही माहिती चोरी होत असल्याबद्दल विचारले गेले तेव्हा शाळेचे संचालक आणि इंडिपेंड्ट स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष एच एस मामिक यांनी सांगितले की, माहिती चोरीला जात असल्याचे ऐकून मलाही धक्का बसला. या विरोधात पंजाब पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमच्या माहितीनुसार असे कळाले की, ही माहिती विवेक हायस्कूल मोहालीमधून चोरी झाली आहे. हा अत्यंत गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. आम्ही देखील या प्रकरणाची माहिती घेत आहोत.
छत्तीसगड पालक संघाचे अध्यक्ष नितीन गोयल यांनी सांगितले की, शाळेतील प्रवेशावेळी पालक शाळेवर विश्वास ठेवून त्यांची वार्षिक उत्पन्न, वैवाहिक माहिती पत्ता, सोशल मीडिया प्रोफाइल यांची माहिती अशी वैयक्तिक माहिती देतात. ही त्यांची आणि त्यांच्या मुलांची वैयक्तिक माहिती असते.
गोपनीयतेचे उल्लंघन –
जितेंद्र चोप्रा या पालकांने सांगितले की हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. त्यांच्या मोबाइलवर आता कोचिंग क्लासेसचे सतत मेसेज येत राहतात. तर एका दुसऱ्या पालकांने सांगितले कीआता माझ्या लक्षात येत आहे की मला सतत फोन का येत असतात. ही चिंताजनक बाब आहे.
जेव्हा प्रश्नावर जास्त चर्चा झाली तेव्हा शालेय शिक्षणचे संचालक रविंद्रजीत सिंह बरार म्हणाले की मला ही उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यावर धक्का बसला, याचा कसून तपास होईल.
छत्तीसगडचे पोलीस उपनिरीक्षक ओम बिश्नोई यांनी सांगितले की यावर बोलण्यापूर्वी प्रकरणाची माहिती घेतील.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘फूड पॉयजनिंग’ कशामुळे होते? ‘ही’ आहेत 5 लक्षणे ?
- ‘फंगल इंन्फेक्शन’ दूर करण्यासाठी ‘या’ 2 प्रकारे करा कडूलिंबाचा वापर !
- मक्याच्या कणीसाचे ‘हे’ आहेत 4 फायदे, मात्र…त्यावर पाणी पीणे नुकसानदायक
- पचनक्रिया बिघडली असेल तर आहारात ‘या’ 7 गोष्टींचा करा समावेश
- तुम्हाला ऑफिसमध्ये सतत झोप येते का? ‘ही’ 4 कारणे असू शकतात !