मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ भाई जगताप यांच्या गळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपीदी (Mumbai Congress President) अखेर भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. तर चरणसिंह सपरा हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नते के.सी वेणुगोपाल यांनी पत्रक काढत याबाबतची घोषणा केली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यपदाच्या हालचालींना वेग आला होता. भाई जगताप यांच्यासह मनहास, चरणसिंग सपरा आणि नसीम खान हे देखील अध्यपदासाठीच्या स्पर्धेत होते. मात्र मुंबई काँग्रेसचा आक्रमक चेहरा अशी ओळख असणाऱ्या भाई जगताप यांची अखेर अध्यक्षपदी निवड झाली आहे.

मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळे हे खांदेपालट करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांनी लॉबिंग सुरु होते. यामध्ये वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता. अखेर भाई जगताप यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्र आली.

दरम्यान इच्छकांनाही काहीना काही पदं देण्यात आली आहेत. यापैकी मोहम्मद आरिफ नसिम खान (प्रचार समितीचे अध्यक्ष), डॉ. अमरजितसिंह मनहास (समन्वय समिती अध्यक्ष), सुरेश शेट्टी (जाहीरनामा आणि प्रकाशन समिती अध्यक्ष), चंद्रकांत हंडोरे (मुंबईचे प्रभारी) गणेश यादव (तपासणी आणि रणनीती समिती, सचिव), प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.