Bhandara Crime News | धक्कादायक! कारचे स्टीअरिंग अचानक लॉक झाल्याने महाप्रसादाच्या मंडपात शिरली कार

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – Bhandara Crime News | काल महाशिवरात्री असल्याने राज्यात ठिकठिकाणी महाप्रसाद व पूजेचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यात देखील अशाच एका महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान एक भीषण दुर्घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील श्री संत जगनाडे चौकात असलेल्या महादेव मंदिरासमोर महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाप्रसाद सुरू होता. यादरम्यान रस्त्याने जाणाऱ्या एका कारचे स्टीअरिंग अचानक लॉक झाल्यामुळे गाडी थेट मंडपात घुसली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात आठ भाविक गंभीर जखमी झाले आहे. तर काही दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Bhandara Crime News)

काय घडले नेमके?
भंडारा येथील मोहाडी येथील बायपास रोडवर असलेल्या महादेव मंदिराच्यासमोर महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास भंडारा येथील नीरज लाला बनकर (वय 45) हे आपल्या कुटुंबाला घेऊन दर्शनाला जात होते. यादरम्यान अचानक त्यांच्या कारचे स्टेरिंग लॉक झाले आणि गाडी अनियंत्रित झाली आणि महाप्रसाद सुरू असलेल्या मंडपामध्ये घुसली. (Bhandara Crime News)

यामध्ये राजेंद्रनगरातील बँक अभिकर्ता संजय महादेव पारधी, महेंद्र वसंता डेकाटे (वय 32) रा. गांधीवार्ड,
हिरालाल देवचंद थोटे (वय 35), रा. नेहरूवार्ड , गुलाब लाला बोरकर (वय 42) रा. चिचखेडा, हरिदास मार्कंड ईलमे (वय 27) रा. भिकारखेडा, पंकज जीवन कटकवार (वय 30) रा. टिळकवार्ड, शिवशंकर गोपीचंद चिंधालोरे (वय 29) रा. नेहरूवार्ड, चैतराम जगन पराते (वय 61) रा. मोहाडी हे गंभीर जखमी झाले. या सगळ्यांना तातडीने मोहाडी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात दुचाकींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Web Title :- Bhandara Crime News | as steering suddenly locked car entered mahaprasad mandap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rakhi Sawant | गरोदर असल्याच्या चर्चांवर राखी सावंतने सोडले मौन ; आदिल खानवर केले गंभीर आरोप

Onkar Bhojane – Vanita Kharat | ओंकार आणि वनिताच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल; वनिताच्या नवऱ्याने या भेटीनंतर दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन