Bharat Jadhav | गौरव मोरेने भरत जाधव यांच्या वाढदिवशी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
पोलीसनामा ऑनलाइन टीम : आज दिग्गज अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) याचा वाढदिवस आहे. भरतने त्याच्या दमदार अभिनयातून मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःचे असे स्थान निर्माण केले. त्यांनी त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांकडून भरभरून कौतुकदेखील करून घेतले. ‘जत्रा’, ‘साडे माडे तीन’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘पछाडलेला’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी त्याच्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील हास्य जत्रा या कार्यक्रमातील एका कलाकाराने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत जे सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. (Bharat Jadhav)
फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली असा कलाकार गौरव मोरे यांनी भरत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. गौरवने त्याचा इन्स्टाग्राम अकाउंटवर भरत जाधव सोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भरत सर लव यू सर”. हा फोटो नुकताच भरत आणि गौरव लंडनमध्ये एकत्रित चित्रीकरण करत असतानाचा आहे.
लवकरच भरत जाधव (Bharat Jadhav) सोबत गौरव मोरे चित्रपटात दिसणार आहे.
सध्या गौरवच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे,
तर या पोस्टवर अनेक जण कमेंट करून भरत जाधवला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
Web Title :- Bharat Jadhav | maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared special post for actor bharat jadhav birthday
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार
- Pune Crime | सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ व्यावसायिकाला घातला 11 लाखांचा गंडा
- Shah Rukh Khan | शाहरुख खानने मुलाखतीदरम्यान त्याच्या ‘या’ वाईट सवयीबद्दल केला खुलासा