Bharat Jodo Yatra | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील बड्या नेत्याला धक्काबुक्की, चेहऱ्याचा भाग फॅक्चर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु असून याची देशभरात चर्चा सुरु आहे. पुढील काही दिवसांमध्ये भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. परंतु त्यापूर्वी तेलंगणामध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील एका नेत्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्राचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे हैदराबादमध्ये भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले होते. ते राहुल गांधी यांच्यासोबत चालत होते. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस (Telangana Police) प्रयत्न करत होते. त्यावेळी तेलंगणाच्या एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले. या सगळ्या गोंधळात राऊत यांच्या डोळ्याला जबर मार बसला आहे.

राऊत यांना ढकलल्याने ते जमिनीवर जोरात आपटले. त्यावेळी त्यांचं डोकं जमिनीवर आपटणार होतं. त्यापासून वाचवण्यासाठी राऊत यांनी डोक्याभोवती हात ठेवला होता. परंतु, या प्रयत्नात त्यांच्या उजव्या डोळ्याला जबर मार लागला असून डोळ्याच्या भुवईचा भाग कापला गेला आहे. त्यामुळे त्यांचा डोळा काळानिळा पडला आहे. त्यांच्या हातापायाला देखील जखमा झाल्या आहेत. यानंतर राऊत यांना उपचारासाठी हैदराबादच्या वासवी रुग्णालयात (Vasavi Hospital, Hyderabad) दाखल करण्यात आले.

भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) घडलेल्या या घटनेनंतर काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Congress President Mallikarjun Kharge) , के.सी. वेणुगोपाल
(K.C. Venugopal), के. राजू (K. Raju) यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी रुग्णालयात जाऊन नितीन राऊत
यांची भेट घेतली. तसेच राहुल गांधी यांनी फोनवरुन संपर्क साधून राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
हा सर्व प्रकार मंगळवारी संध्याकाळी घडला. डॉक्टरांनी राऊत यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या डोळा
आणि कानाचा भाग फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title :-  Bharat Jodo Yatra | nitin raut admitted to vasavi hospital in hyderabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bank Loan | ग्राहकांना महा फटका! या तीन बँकांचं कर्ज महागलं, EMI आणि व्याजदरही वाढला

IND vs BAN | 4 वर्षापासून बांग्लादेशला सतावणाऱ्या ‘त्या’ कमजोरीचा टीम इंडिया उचलणार फायदा