Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची रविवारी खेड येथे सभा झाली. ही सभा ‘ढ’ विद्यार्थ्यांची होती अशी टीका आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 5 मार्चला याच मैदानावर सभा झाली होती. त्यामुळे आमच्या सभेचा विक्रम आणि उच्चांक त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यासाठी निम्म्या राज्यातून लोक आणली होती. तरीदेखील आमच्या सभेच्या जवळपास येऊ शकले नाही. म्हणून त्यांना ‘ढ’ विद्यार्थी म्हणतो, अशी खिल्ली भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी उडवली. ते माध्यमांशी बोलत होते.

रामदास कदम कोकणातील जोकर

रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या भाषणावरुन टीका करताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, कदमांकडून एकही नवीन मुद्दा उपस्थित केला जात नाही. मला आणि माझ्या मुलाला कसं संपवलं, हेच सांगतात. काल म्हटलं, मी विरोधी पक्षनेता होतो, म्हणजे पुढचा मुख्यमंत्री असतो, म्हणून उद्धव ठाकरे यांनी मला पाडलं. ते जर मुख्यमंत्री झाले तर ही सर्वात मोठी चेष्टा असेल. म्हणून रामदास कदमांना आता कोकणातील जोकर ही नवीन उपमा देण्याची गरज आहे.

चिन्ह आणि पक्षाचं नाव ठाकरेंना मिळणार

मातोश्रीचे (Matoshree) दारं उघडी ठेवल्यावर बाकीचे सुद्धा निघून जातील फक्त पितापुत्र राहतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना भास्कर जाधव म्हणाले, उद्धव ठाकरेंचा पक्ष शिल्लक राहील की नाही, त्याची काळजी तुम्ही कशाला करता. तुम्ही पक्षाचं चिन्ह आणि नाव घेतलं ते कसं टिकेल याची काळजी घेतली पाहिजे. पक्ष चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरेंना मिळणार, हे सगळ्यांना माहिती आहे.

भाजपने लिहिलेली स्क्रिप्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण भाजपने (BJP) लिहिलेली स्क्रिप्ट होती अशी टीका भास्कर जाधव
यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह
(Home Minister Amit Shah) यांचा मोठेपणा, 370 कलम, राम मंदिर यावर त्यांनी भाष्य केलं.
राम मंदिर काय भाजपने बांधलं का? असा सावाल जाधव यांनी उपस्थित केला.

Web Title : Bhaskar Jadhav | bhaskar jadhav attacks ramdas kadam on cm post comment khed sabha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Popatrao Gawade | राष्ट्रवादीचे माजी आमदार, शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडे रूबी हॉलमध्ये दाखल, उपचार सुरू

Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या