Bhaskar Jadhav On Chandrashekhar Bawankule | ‘वेस्ट इंडिजच्या खेळाडूने…’ भास्कर जाधवांचा चंद्रशेखर बावनकुळेंना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bhaskar Jadhav On Chandrashekhar Bawankule | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना यापुढे ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल. कारण ठाकरेंनी आता राजकारणाची पातळी सोडली आहे, असे बावनकुळे म्हणाले होते. याला आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा, असा इशारा भास्कर जाधव यांनी बावनकुळे यांना दिला आहे. (Bhaskar Jadhav On Chandrashekhar Bawankule)

भास्कर जाधव म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका करतात. कधी घरकोंबडा तर आणखी काही म्हणतात. मी बावनकुळेंना वेस्ट इंडिजचा खेळाडू बोलल्यावर व्यक्तीगत टीका केली म्हणाले. मग, उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणता, ही व्यक्तीगत टीका नाही का? असा सवाल जाधव यांनी विचारला. (Bhaskar Jadhav On Chandrashekhar Bawankule)

वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची माहिती काय कळणार? तुम्हाला आणि फडणवीसांना काही बोलायचं नाही. आमच्या पक्षप्रमुखांवर तुम्ही वाटेल ते बोलणार का? हे चालणार नाही. वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम लावावा, असा इशारा भास्कर जाधव यांनी बावनकुळे यांना दिला.

काय म्हणाले बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे ट्विटर अकाऊंटवर म्हटले की, उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीर सभेतून घरकोंबडा म्हणावं लागेल. कारण त्यांनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे. खरे तर सत्तेसाठी तुम्ही हपापले होते आणि आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तीक टीका भाजप सहन करणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

GST Fraud Case | कर चोरी प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई; दोन व्यक्तींना अटक