Post_Banner_Top

BHEL मध्ये  २४ जागांसाठी भरती, २.८ लाखांपर्यंत मिळणार पगार  

पोलिसनामा ऑनलाईन –  BHEL (Bharat Heavy Electricals limited) च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार इंजीनियर्स आणि मॅनेजमेंटच्या पदांसाठी २४ जागांची भरती निघाली आहे. या पदांसाठी BHEL च्या वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार असून हे अर्ज 10 जून 2019 सकाळी १० पासून साकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 जून 2019 ही असेल. पद आणि पगाराबद्दल अधिकची माहिती खालीलप्रमाणे :

पद आणि पगार

डेप्युटी मॅनेजर – E3- (80,000-2,20,000)

सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर – E6A- (1,20,000-2,80,000)

सीनियर इंजीनियर – E2- (70,000-2,00,000)

मॅनेजर – E4- (90,000-2,40,000)

या जागा केवळ अनुभवी उमेदवारांसाठीच असून नवोदित उमेदवारांनी यासाठी अर्ज करू नयेत. उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीनंतर होईल आणि १ वर्ष प्रोबेशन पिरियड वर राहावे लागेल.
BHEL  च्या वेबसाईट वर CAREER WITH BHEL मध्ये  Current Job Openings या सेक्शन मधून फॉर्म भरता येईल.

Loading...
You might also like