BHEL Recruitment 2020 : BHEL मध्ये विविध पदासाठी भरती, पगार 80 हजार रुपये, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने ( Bharat Heavy Electricals Limited) विविध पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेत एकूण 7 पदे भरली जाणार आहेत. या पैकी 5 पदे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी ग्रुपमध्ये असून 1 पद, फायनान्समध्ये, तर आणखी एक पद एचआरमध्ये आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 31 डिसेंबर 2020 ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर अर्ज करता येणार नाही. महत्वाची बाब म्हणजे ही भरती केवळ 1 वर्षाच्या कालावधीसाठी होत आहे. मात्र जास्तीत जास्त कार्यकाळ 3 वर्षापर्यंत राहिल. या पदासाठी उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

असा करा अर्ज
-सर्वप्रथम उमेदवारांनी www.careers.bhel.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
-आता आवश्यक माहिती द्या आणि लेटेस्ट स्टेटस लिंकवर लॉगिन करावे.
-आता तुमची कागदपत्रे अपलोड करा.
-यानंतर ऑनलाईन अर्ज भरा आणि सबमिट करा.
-अर्ज दोन टप्प्यात भरावा लागेल,हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे.
-त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.

या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल. पहिल्या मुलाखतीतून निवडलेल्या उमेदवारांना आणखी एका मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा 80 हजार रुपये वेतन देण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी सर्व अधिकृत सूचना वाचून घ्यावी.