भिगवण पोलिसांची अवैध वाळूमाफियांवर धडक कारवाई, एक कोटीचा मुद्देमाल नष्ट तर 17 आरोपीं ताब्यात

इंदापूर : उजनी जलाशयातुन अवैध वाळूची तस्करी करणाऱ्या वाळूमाफियांवर भिगवण पोलिसांनी धडक कारवाई करत २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तर १७ आरोपींना ताब्यात घेतले असुन एक कोटी दोन लाखांच्या ४ फायबर बोटी व दोन हायड्रोलीक बोटी जागेवरच नष्ट केल्या आहेत.तसेच जागेवरून तीन लाख रुपये किमतीची ५६ ब्रास वाळू जप्त केली आहे. भिगवण पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले असुन सदरची कारवाई इंदापूर तालुक्यातील डिकसळ पूलाजवळ भिगवण पोलिस पथकाने शनिवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास केली.

80 लाख रुपये किमतीच्या चार फायबर बोटीसह वीस लाखांच्या दोन यांत्रिकी बोटी अशा एक कोटी रुपये किमतीच्या बोटी जिलेटीच्या साह्याने स्फोट घडवून पोलीसांनी जागेवरच नष्ट केल्या. त्याचप्रमाणे दोन लाख ८० हजार रुपये किमतीची ५६ ब्रास वाळू जप्त केली असून बोटींचे मालक परप्रांतीय चालक अशा २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर बोटमालक मधू गोडसे,बाबू मोरे दोघे रा. शिरापूर ता. दौंड,गणेश यादव रा. कात्रज ता. करमाळा,जि. सोलापूर हे तिघेजण जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. पूणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पुणे अधिक्षक पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून वाळू माफियांवर चांगले लक्ष्य केंद्रीत केल्याने वाळूमाफियांत दहशत पसरली आहे.

सिपु नुरुलहक्क शेख,(वय ३०), मोहम्मद नाईम जल्लालुददीन अख्तर,(वय २३), जहिर शहजहांन शेख (वय ३०), साहिब पेशकर शेख,(वय ३२),सर्व रा.बिकोल टोला ता.उत्तर पलशगच्छी जि.साहेबगंज राज्य झारखंड, मोहम्मदहुसेन अहमदहुसेन शेख,(वय ३०) रा लकीपुर ता.मनसिंग जि.साहेबगंज राज्य,झारखंड, मुश्राफ काद शेख,(वय २७), इस्माईल इन्साराली शेख,(वय ३६) दोन राचमायाम ता.दखन पलशगच्छी जि.साहेबगंज राज्य,झारखंड, अन्सुर इनामुल शेख, (वय २८) सोहिदुल एसिन शेख,(वय २५) दोन्ही रा.शुभानी टोला ता.खसमाल जि साहेबगंज, राज्य, झारखंड, अरूण जोशराली रशिद, (३४ वर्ष),पिटलु आबुल शेख,(वय ३२), सारीफ साटिक शेख,(वय ३०) नुरआलम कुदरत शेख, (वय ३०) मिस्टर महिबुर शेख (वय २०) शहुबुत अज्जुल शेख,(वय ३३) सर्व राजमशेटोला ता, पलशगच्छी जि.साहेबगंज राज्य झारखंड समीम सायद शेख,(३० वर्ष) राखसपुरा ता.कटलवाडी जि. साहेबगंज राज्य झारखंड, कौसर मनसुर शेख (वय २३) दार्षे सहमदुलटोला ता.दक्षिण पलशगच्छी जि. साहेबगंज राज्य, झारखंड अशी आरोपींची नावे आहेत.

उजनी जलाशय डिकसळच्या हद्दीत बॅकवॉटरच्या भागात काहीजण वाळू फायबर बोटीसह सेक्शन बोटींच्या साह्याने वाळू उपसा करत असल्याचे पोलिसांना समजले होते त्यानुसार भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने यांनी पोलिस पथकासह पहाटेच्या सुमारास होडीच्या साह्याने जावून धडक कारवाई केली. यामध्ये चार फायबर बोटी व दोन सेक्शन बोटी ताब्यात घेऊन जिलेटीनने महसूल पथकाच्या साह्याने उध्वस्त केल्या. तर २ लाख ८० हजार रुपयांची ५६ ब्रास वाळू जप्त केली. सदरची कारवाई ही ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने,पोलिस हवालदार दत्तात्रय जाधव, इन्कलाब पठाण, पोलीस नाईक समीर करे.पोलीस कॉन्सटेबल,निंबाळकर,संजय काळभोर यांच्या पथकाने केली.