आरक्षणाच्या मुद्यावरून भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांचं मोहन भागवतांना खुलं ‘आव्हान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  “जातीव्यवस्थेमुळे दलितांवर नेहमीच अत्याचार झाला आहे. स्वातंत्र्यानंतरही आजतागायत ५४ टक्के दलितांकडे स्वतःच्या मालकीच्या जमीनी नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरक्षणाचा मुद्दा मांडून त्यांच्या मनातील दलितविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे. आरक्षणाच्या विरोधात असलेल्या भागवतांना आरक्षणाच्या मुद्द्यावर खुली चर्चा करण्याचे आव्हान देतो.” या शब्दांत भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी भागवतांना खुल्या चर्चेच आव्हान दिले आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, देशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिका नेहमीच नकारात्मक असतात. त्यातच आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, “जातिव्यवस्था संपविण्यासाठी चर्चा होणं गरजेचं आहे. जातीव्यवस्थेने देशाला पोखरलं आहे. भागवत यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करावी. सर्व प्रसारमाध्यमे आणि सर्व पक्षांच्या समोर ही चर्चा करण्यात येईल. मात्र सरकारने आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला तर लोक रस्त्यावर उतरतील.”

मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमादरम्यान आरक्षणाला समर्थन देणारे आणि विरोध करणाऱ्यांनी शांततेत चर्चा करावी. ‘ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांनी आणि ज्यांना आरक्षण नको असेल त्यांनी आरक्षणाच्या विषयावर सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करु असे मत व्यक्त केले होते. मात्र त्यावेळी मुळ मुद्दा भरकटून खूप विवाद झाला होता असेही ते म्हणाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –