Bhima Patas Sugar Factory Corruption Case | 500 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी क्लिनचीट मिळाल्यावर राहुल कुल यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bhima Patas Sugar Factory Corruption Case | भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने (State Government) आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांना क्लिन चिट (Clean Chit) दिली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी राहुल कुल यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा आरोप केला होता. याप्रकरणी कूल यांना आज (दि.28) क्लिन चिट मिळाली आहे. यावर आता राहुल कूल यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, हे सगळे राजकीय आरोप होते. त्यात काहीच तथ्य नव्हतं. हे मी या आधीपण सांगितलं होतं आणि आजही तेच सांगेन. (Bhima Patas Sugar Factory Corruption Case)

आमदार राहुल कूल म्हणाले, या आरोपांमध्ये तथ्य नाही. संजय राऊतांना सत्य काय आहे हे महिती नाही. मी आरोप झाल्यावर तीन दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांच्या शंकांचे निरसन केले होते. अशा चौकशा याआधी झाल्या आहेत. त्यामध्ये तथ्य नाही. या चौकशीतून काहीही बाहेर आलेलं नाही. यापुढेही काही बाहेर येणार नाही. उलट आरोप झाल्यावर माझ्या मतदार संघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी निषेधाचा मोर्चा काढला होता. (Bhima Patas Sugar Factory Corruption Case)

राहुल कुल पुढे म्हणाले, संजय राऊत यांनी आजपर्यंत जेवढे आरोप केले, त्यातील एकही आरोप खरा ठरलेला नाही. ते एकेकाळी असं म्हणाले होते, गुवाहाटीवरुन 40 मृतदेह येतील, तसं काही झालं का? त्यामुळे त्यांना फारसं गांभीर्याने घेऊ नका. लोकांनी मला दोन वेळा निवडून दिलं आहे, ही लोकांची क्लिन चिट आहे.

सरकार म्हणजे क्लिनचिट कारखाना

राहुल कूल यांना क्लिन चिट दिल्यानंतर खासदार संजय राऊत म्हणाले, हे सरकार म्हणजे क्लिनचीट देणारा कारखाना आहे.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात शेतकरी सभासद आहेत.
शेतकऱ्यांचे 500 कोटी चोरले आहेत. लेखापरिक्षकांना क्लिन चिट देताय,
उद्या आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही कारवाई करु, असा इशारा राऊत यांनी दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bharati Sahakari Bank Case | हा सायबर हल्ला नाही, ग्राहकांचे आर्थिक नुकसान झालेले नाही; भारती सहकारी बँकेचा खुलासा