भिमाशंकर महामार्गावर दरड कोसळण्याची भिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

श्रीक्षेत्र भिमाशंकरला जाण्यासाठी मंचर-भिमाशंकर मार्गावर दररोज हजारो वाहने धावत असतात. या मार्गावर एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. यामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे असल्याने प्रवासी त्रासले असतानाच आता आता दरड कोसळण्याच्या शक्यतेने प्रवासी धास्तावले आहेत.

जाहीरात

डिंभेपासून जवळच असलेल्या पोखरी घाटात अनेक धोकादायक वळण आहे. खड्डयांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावर पावसाळ्यात अनेकदा दरड कोसळण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. डोंगरालगत रस्ता असल्यामुळे आणखी दरड कोसळल्यास रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने वेळीच योग्य ती उपाययोजना करावी. तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून केली जात आहे.

[amazon_link asins=’B01FM7GGFI,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’18c07364-b191-11e8-bf38-d1982c2e9e17′]