home page top 1

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी इंडस्ट्रीतील फेमस अ‍ॅक्ट्रेस रानी चॅटर्जी जेव्हा जेव्हा पडद्यावर येते. तेव्हा तिला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. सोशल मीडियावर तिच्या सिनेमांना, गाण्यांना फोटोंना लाखोंच्या संख्येत लाईक्स मिळतात. रानीचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं तर तुम्हाला तिचे वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतील.

रानी तिचे वजन कमी करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. नुकताच तिने तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच लुकडी दिसत आहे. अनेकांना माहीत नसेल परंतु तिचा हा फोटो २००९ सालचा आहे. जेव्हा तिचं वजन ५९ किलो होतं.

View this post on Instagram

#throwbackpic #2009 #59kg 💙💙💙💙💙💙

A post shared by Rani Chatterjee Official (@ranichatterjeeofficial) on

या सोबतच रानीचा एक जीममधील फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत ती खूपच स्लिम दिसत आहे. या फोटोला रानीने खास कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये ती म्हणते की, “एब्स कमिंग सून… आता कोण म्हणेल की, भोजपुरी हिरोईन जाड्या असतात.”

रानीने २००४ साली ससुरा बडा पइसावाला या सिनेमातून डेब्यू केला होता. या सिनेमात ती मनोज तिवारीसोबत मुख्य भूमिकेत होती. अजय सिन्हा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता.

यानंतर रानीने अनेक हिट सिनेमात काम केले. यात सीता, देवरा बडा सतावेला, रानी नंबर 786 आणि गंगा, यमुना, सरस्वती या सिनमांचा समावेश आहे. याशिवाय रानीला २०१३ च्या ६ व्या भोजपुरी अवॉर्ड्स शोदरम्यान नागिन सिनेमासाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेस ऑफ द इयर चा पुरस्कार मिळाला होता.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

Loading...
You might also like