पवन सिंहचा धमाकेदार भोजपुरी सिनेमा ‘घातक’चा फर्स्ट लुक Out, पहा अभिनेत्याचा अॅक्शन अवतार !

भोजपुरी इंडस्ट्रीचा किंग म्हणवल्या जाणाऱ्या सुपरस्टार पवन सिंह गोल्या काही दिवसांपासून आपल्या गाण्यांमुळं चर्चेत येत आहे. ज्या सिनेमात किंवा गाण्यात पवन सिंह असतो ते गाणं किंवा सिनेमा आधीच सुपरहिट मानला जातो. चाहतेही त्याच्यासाठी क्रेजी असतात. सध्या पवन सिंह त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आहे. नुकताच त्याच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. घातक असं या भोजपुरी सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला.

अभय सिन्हा आणि टीनू वर्मा प्रस्तुत यशी फिल्म्स इंटरनॅशनल बॅनरअंतर्गत हा सिनेमा तयार होत आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. या लुकध्ये पवन सिंह सिनेमाच्या नावाप्रमाणंच घातक आणि आकर्षक दिसत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत मेहंदी लगा के रखना 3 या सिनेमातून चर्चेत आलेली साऊथची अभिनेत्री सहर आफसा हीदेखील काम करताना दिसणार आहे. फर्स्ट लुकमध्ये तिचीही झलक पहायला मिळत आहे. टीनू वर्माही लुकमध्ये शानदार दिसत आहे.

अभय सिन्हा हे घातक सिनेमाचे प्रोड्युसर आहेत तर निशांत उज्ज्वल हे को प्रोड्युसर आहेत. हा एक अ‍ॅक्शन सिनेमा आहे. ट्रेलर कधी रिलीज होणार आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. टीनू वर्मा सिनेमा डायरेक्ट करत आहे. सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सिनेमातील गाणीही सुंदर असणार आहेत अशी माहिती आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like