Bhumi Pednekar | “…सिनेमांतून मी स्वतःचा वारसा तयार करत आहे” भूमी पेडणेकरने केल्या मनोरंजन विश्वाबद्दल भावना व्यक्त

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिचे नाव हमखास येते. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने तिच्या जीवंत अभिनयाच्या बळावर या मनोरंजन विश्वामध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भूमीचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या विविध विषयांवरील भूमिका या प्रेक्षकांना नेहमीच भावत असतात. तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये भूमीने अनेक हिट चित्रपट (Bhumi Pednekar Hit Movie) दिले आहेत. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिला तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअर आणि तिच्या भूमिकांवर प्रश्न विचारण्यात आले. यावर भूमी पेडणेकर हिने समर्पक उत्तर तर दिलेच तसेच ती म्हणाली की सिनेमांतून मी स्वतःचा वारसा तयार करत आहे.

बॉलीवुड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही यशाच्या शिखरावर असणारी अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतात. अभिनेत्री भूमीचे सौंदर्य व तिचे जीवंत अभिनय करण्याचे कसब यामुळे ती खूप नावाजली जाते. भूमीच्या भूमिका देखील वेगळ्या प्रकारच्या असतात. तिने ‘दम लगा के हैशा’ (Dum Laga Ke Haisha) या चित्रपटामधून मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण केले. पहिल्यांच चित्रपटात तिने तिच्यामधील अभिनय कौशल्य दाखवून दिले होते.

तिला तिच्या या अभियन कौशल्य व भूमिका याबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली की, “मला कामात बुडून जायला आवडतं. आपण अभिनेत्री आहोत आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण चिरकाल राहाणाऱ्या व्यक्तीरेखा तयार करण्यासाठी खर्च करतोय ही गोष्ट मला सुखावणारी आहे. अभिनय हा खूप वेगळा आणि खास व्यवसाय आहे. त्याच्याकडे अतिशय गांभीर्याने पाहावं लागतं. सिनेमाच्या सेटवर पाऊल ठेवल्या क्षणापासून माझं मन कृतज्ञतेनं भरून जातं. आपलं काम अजरामर राहाणार आहे ही गोष्ट मला दिलासा देते. म्हणूनच कोणत्याही सिनेमासाठी मी 200 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करते”

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिची प्रत्येक भूमिका एक शिकवण देणारी आणि समाजाचे मत व्यक्त करणारी असते. तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात. भूमी पुढे म्हणाली की, ‘माझ्या प्रत्येक सिनेमातून कायमस्वरुपी ठसा समाजावर उमटेल याची मी काळजी घेते, कारण सिनेमा हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. आज आम्ही ज्याची निर्मिती करतोय, ते कायम पुढे लक्षात ठेवलं जाईल आणि काळाच्या कसोटीवर त्याची सतत परीक्षा देखील घेतली जाईल. आम्हाला त्या निर्मितीतून काय म्हणायचं होतं, हे वारंवार तपासलं जाईल. कला ही कायम अमर असते. त्यामुळे भूमिका करताना मी खूप दक्षता घेते.” असे मत अभिनेत्री भूमी पेडणेकरने व्यक्त केले आहे.

तिचे चित्रपट हे इतर चित्रपटांपेक्षा आणि भूमिका देखील वेगळ्या असतात यावर भूमीला मुलाखतीमध्ये विचारण्यात आले. त्यावर भूमी म्हणाली, “मला कायमच सिनेमांच्या माध्यमातून सांस्कृतिक परिणाम घडवून आणणारी अभिनेत्री व्हायचं होतं. म्हणूनच मी नेहमी प्रेरणा देणाऱ्या सिनेमांचीच निवड करते आणि त्यासाठी सर्वोत्तम योगदान देते. या सिनेमांतून मी स्वतःचा वारसा तयार करत आहे आणि मी जे काम करते त्याचा मला अभिमान वाटतो.” असे मत अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने मांडले.

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
तिच्या अदांवर व अभिनयावर घायाळ झालेला मोठा चाहता वर्ग आहे.
भूमी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिने 2015 साली ‘दम लगा के हैशा’ चित्रपटातून
बॉलीवुडमध्ये पदार्पण (Bhumi Pednekar Bollywood Debut) केले होते.
त्यानंतर तिने बाला (Bala), पती पत्नी और वो (Pati Patni Aur Woh),
बधाई दो (Badhaai Do), रक्षाबंधन (Raksha Bandhan), टॉयलेट: एक प्रेम कथा (Toilet: Ek Prem Katha),
भीड (Bheed) या हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. भूमीने मॅन्स वर्ल्ड (Man’s World)
व लस्ट स्टोरीज (Lust Stories) या वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nora Fatehi | नोरा फतेहीने जॅकलिनविरोधात वक्तव्ये केल्यास…” जॅकच्या वकिलांनी नोराला सुनावले खडे बोल