Bhumi Pednekar | माजी गृहमंत्र्यांची लेक ते बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री, भूमी पेडणेकरचा थक्क करणारा प्रवास

ADV

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या अभिन्यनाच्या बळावर बॉलीवुडमध्ये हक्काची जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar). भूमीच्या निखळ हास्यावर व सौदर्यावर अनेक चाहते फिदा आहेत. भूमीने अनेक वास्तवदर्शी चित्रपटांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे. कास्टिंग डायरेक्टर म्हणून कामाला सुरुवात केलेली भूमी आज बी टाऊन मधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिचा आज वाढदिवस असून ती 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.

 

 

 

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा जन्म 18 जुलै 1989 रोजी मुंबई येथे झाला. तिचे वडिल सतीश पेडणेकर (Satish Pednekar) हे महाराष्ट्राचे माजी गृह आणि कामगार मंत्री होते. भूमीचे वडील महाराष्ट्रीयन तर आई हरीयाणाची आहे. राजकारणाच्या घरात मोठी झालेली भूमी हिला जुळी बहिण असून समिक्षा असे तिचे नाव आहे. समिक्षा ही वकिल म्हणून कार्यरत आहे. सुरुवातीला भूमी यशराज फिल्म्समध्ये (Yash Raj Films) सहाय्यक कास्टिंग दिग्दर्शक (Assistant Casting Director) म्हणून काम करु लागली. तिथे भूमीने कामादरम्यान एक डेमो करुन दाखवला व तिच्या साठी अभिनय क्षेत्राची कवाडे खुली झाली.

 

 

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने ‘दम लगा के हैशा’ (Dum Laga Ke Haisha) या चित्रपटासाठी यशराज फिल्म्समध्ये डेमो दिला. त्यावेळी तिचे कास्टिंग केले जाणार आहे याची भूमीला जाणीव नव्हती. तिला हा फक्त डेमो चालू आहे असे वाटले पण तिची अशाप्रकारे ऑडिशन घेण्यात आली. त्यानंतर तिचा पहिला चित्रपट ‘दम लगा के हैशा’ साठी तिने तब्बल 90 किलो वजन वाढवले. हा चित्रपट सुपरहिट ठरला व तिच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. भूमीला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) मिळाला होता. त्यानंतर भूमीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

 

 

अभिनेत्री भूमी पेडणेकर हीने अनेक एकामागून एक हिट चित्रपट दिले. टॉयलेट: एक प्रेम कथा (Toilet: Ek Prem Katha), शुभ मंगल सावधान (Shubh Mangal Saavdhan), बाला (Bala) व पत्नी पत्नी और वो (Patni Patni Aur Woh) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. भूमीने मॅन्स वर्ल्ड (Man’s World) व लस्ट स्टोरीज (Lust Stories) या वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे. भूमी ही नेहमी तिच्या चित्रपटांमुळे व फॅशनमुळे चर्चेत असते. अभिनेत्री भूमी अनेकदा आपल्या हटके स्टायलिंगचे बोल्ड फोटो (Bhumi Pednekar Bold photo) सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा आज वाढदिवस (Bhumi Pednekar Birthday) असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

Web Title : Bhumi Pednekar | know more about bhumi pednekar on her birthday Entertainment News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा