Kirit Somaiya Viral Video | किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओतील ‘ती’ महिला कोण?, ठाकरे गटाचा सवाल

Kirit Somaiya Viral Video | kirit-somaiya-viral-video-case-to-be-investigated-at-high-level-announced-home-minister-devendra-fadnavis
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाला असून हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) गाजला. भाजपचे माजी खासदार (BJP MP) किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे आमदार (Thackeray Group MLA) अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि अनिल परब (Anil Parab) या दोघांनी या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या व्हिडिओची सत्याता बाहेर आली पाहिजे. ती महिला कोण हे समोर आले पाहिजे अशी मागणी अनिल परब यांनी सभागृहात केली. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

सभागृहात आज मांडण्यात आलेला हा विषय नक्कीच गंभीर आहे. राजकारणात अनेक वेळा असे प्रसंग येतात, ज्यात मासणाचं संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लागते, केलेली पुण्याई पणाला लागते. आता जो काही प्रकार समोर आला आहे, त्या संदर्भात विरोधकांकडे काही तक्रारी असतील तर त्या आमच्याकडे द्याव्यात. आम्ही या सगळ्याची चौकशी करु. फक्त गृहितकांच्या आधारे चौकशी करता येणार नाही. त्यामुळे विरोधकांनी सोमय्या व्हिडिओ प्रकरणात (Kirit Somaiya Viral Video) त्यांच्याकडे असलेले सबळ पुरावे आमच्याकडे द्यावेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

कोणाला पाठीशी घालणार नाही

किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. अशाप्रकारच कुठलेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही.
किरीट सोमय्या यांनी मला पाठवलेल्या पत्रातही तीच मागणी केली आहे.
या सगळ्याची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मात्र, संबंधित प्रकरणात महिलेची ओळख जाहीर करता येणार नाही. त्यामुळे पोलीस या महिलेची ओळख पटवतील आणि कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाचा तपास करतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे आता चौकशीतून काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title : Kirit Somaiya Viral Video | kirit-somaiya-viral-video-case-to-be-investigated-at-high-level-announced-home-minister-devendra-fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’