भूमी पेडणेकरच्या ‘दुर्गावती’ सिनेमाचं नाव बदललं ! ‘खिलाडी’ अक्षयनं पोस्टर शेअर करत सांगितली रिलीज डेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला. या सिनेमानं धमाल तर नाही केली, परंतु यावरून वाद नक्की झाला. आता अक्षयचा नवीन सिनेमा येत आहे, याचं नाव दुर्गमती : द मिथ ( Durgamati : The Myth) आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय या सिनेमाचा प्रोड्युसरदेखील आहे. अक्षय आता या सिनेमातून धमाल करण्यासाठी तयार आहे. अक्षयनं सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे.

अक्षयनं शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) दिसत आहे. यात तिचा दमदार लुक पाहायला मिळत आहे. अद्याप तरी सिनेमाबद्दल जास्त माहिती समोर आलेली नाही. परंतु भूमीचा कमाल अंदाज पाहायला मिळणार आहे एवढं मात्र नक्की आहे. आधी या सिनेमाचं नाव दुर्गावती (Durgavati) होतं. परंतु मेकर्सनं हे नाव बदलून आता दुर्गामती : द मिथ केलं आहे. आता सिनेमाच्या नव्या टायटलसह पहिलं पोस्टर समोर आलं आहे. यात भिंतीवरील आरशात भूमीचा रागीट लुक दिसत आहे.

पोस्टर शेअर करताना अक्षयनं लिहिलं की, तुम्ही दुर्गामतीला भेटण्यासाठी तयार आहात ? 11 डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियावर, अशी माहिती समोर आली आहे की, कोरोनामुळं हा सिनेमा थिएटरऐवजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. नुकताच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

You might also like