बायडन सरकार बंद करणार जगातील सर्वात वादग्रस्त तुरुंग; तुरुंगात आहेत बरेच पाकिस्तानी दहशतवादी

पोलिसनामा ऑनलाईन – बायडन सरकारने सुरू केलेल्या आढावानंतर आता काही आठवड्यात किंवा काही महिन्यांत ते जेल बंद करण्याच्या योजनेवर काम सुरू होणार आहे. तथापि, जेल पूर्णपणे बंद करण्यास वेळ लागणार आहे. बायडन यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ते जेल बंद करणार आहे, असे सांगितले होते. त्यानुसार आता ते पावलं टाकत आहेत.

यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही ग्वांटानमो बे कारागृह बंद करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अपयशी ठरला होता. मानवाधिकार संघटनांनी ग्वांतानामो बे कारागृहात टीका केली. त्याचबरोबर बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की, ग्वांतानामो बे कारागृह हे अमेरिकेच्या जागतिक प्रतिमेवरील डाग असल्यासारखे आहे.

11 सप्टेंबर 2001 रोजी हल्ला झाल्यानंतर ग्वांटानामो बे कारागृहाची स्थापना झाली. या कारागृहात बहुतेक परदेशी अनेक गुन्हेगार दाखल आहेत. या तुरूंगात तुरुंगवास भोगल्यानंतर काही लोकांची सुटकाही झाली आहे. परंतु काही अहवालात असे म्हटले आहे की, जेलमधील कैद्यांना कठोर चौकशीला सामोरे जावे लागते. तसेच छळ सहन करावा लागतो.

अमेरिकेच्या जो बायडन सरकारने जगातील सर्वात विवादित तुरूंगातील म्हणजेच ग्वांटानमो बेचा आढावा सुरू केलाय. बायडन सरकारला मुदत संपायच्या आधी गुआंटानमो बे जेल बंद करायचे आहे. या तुरूंगात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील अनेक दहशतवाद्यांसह एकूण 40 लोक तुरूंगात आहेत.

गुआंटानमो खाडी क्युबामध्ये आहे. तुरूंगातील सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त केला आहे. कैद्यांपैकी शेख मोहम्मद आहे, जो 9/11 हल्ल्याची योजना आखत आहेत, ज्यांची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही.